मराठी बातम्या /बातम्या /विदेश /'अमेरिकेनं आम्हाला धोका दिला', White House समोर अफगाण नागरिकांचा आक्रोश

'अमेरिकेनं आम्हाला धोका दिला', White House समोर अफगाण नागरिकांचा आक्रोश

अमेरिकेतील व्हाइट हाऊससमोर आंदोलन करणारे अफगाण नागरिक...

अमेरिकेतील व्हाइट हाऊससमोर आंदोलन करणारे अफगाण नागरिक...

Crisis in Afghanistan: अमेरिकेतील अफगाण नागरिकांनी (Afghan People Protest) एकत्र येत व्हाइट हाऊससमोर तीव्र आंदोलन (Protest At White House) केलं आहे.

वॉशिंग्टन, 16 ऑगस्ट: तालिबान (Taliban) संघटनेनं अफगाणिस्तानात (Afghanistan) सत्ता काबीज करताच, याचे पडसाद आता जगभर उमटत आहेत. अनेक अफगाण नागरिक मिळेल त्या मार्गानं दुसऱ्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण काबूलवरून होणाऱ्या सर्व उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे लाखो लोकांचा जीव टांगणीला लागला आहे. अशा स्थितीत आता अमेरिकेतील अफगाण नागरिकांनी (Afghan People Protest) एकत्र येत व्हाइट हाऊससमोर तीव्र आंदोलन (Protest At White House) केलं आहे. अमेरिकेनं आम्हाला धोका दिल्या अशा भावना आंदोलकांन व्यक्त केल्या आहेत. तसेच यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या विरोधात देखील मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली आहे.

अफगाणिस्तानातील सद्यस्थितीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन जबाबदार असल्याचं आंदोलक अफगाण नागरिकांनी म्हटलं आहे. 'बायडन तुम्ही धोका दिला, बायडन तुम्ही जबाबदार आहात' अशा आशयाच्या घोषणा अफगाण नागरिकांनी अमेरिकेतील व्हाइट हाऊससमोर दिल्या आहेत. या आंदोलनात सहभागी झालेले अफगाणिस्तानचे माजी पत्रकार हमदर्फ गफूरी म्हणाले की, '20 वर्षांनंतर आम्ही 2000 च्या दशकात परतलो आहोत. आम्हाला शांतता हवी आहे.'

हेही वाचा-20 वर्षांनी अफगाणिस्तानात तालिबाननं काढलं डोकं वर; का आणि कोणी केली स्थापना?

"तालिबाननं जर सत्ता काबीज केली, तर देशात हजारो ओसामा बिन लादेन, हजारो मुल्ला उमर जन्माला येतील. ते पाकिस्तानशी हातमिळवणी करत संपूर्ण मध्य आशियामध्ये दहशतवाद पसरवतील. तिथे स्त्रियांना स्वातंत्र्य नसेल आणि त्यांची काळजी घेणारंही कोणी नसेल, अशी भावना पत्रकार हमदर्फ गफूरी यांनी व्यक्त केली आहे. आंदोलनात सामील असणाऱ्या आंदोलनकर्त्या फर्झाना हाफिज यांनी सांगितलं की, तालिबान आमच्या जीवाभावाच्या लोकांना मारत आहे. तिथे महिलांना अजिबात स्वातंत्र्य नाही. तसेच आम्ही इकडे अडकून पडल्यानं आमच्या कुटुंबातील महिलांची काळजी घ्यायला तिथे कुणीही नाही.'

हेही वाचा-'तालिबान आम्हाला जिवंत सोडणार नाही', अफगाणिस्तानहून भारतात आलेल्या महिलेचा टाहो

आंदोलनकर्ती हाफिजानं पुढं सांगितलं की, तिचा 21 वर्षांचा पुतण्या अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. आमच्यापर्यंत येण्यासाठी त्याला व्हिसाही मिळणार होता. पण आता त्याचं काय होईल हे आम्हालाही माहीत नाही? माझं सर्व कुटुंब तिथेचं राहत आहे. दर मिनिटाला धडकी भरत आहे. कुटुंबीयांसोबत बरं वाईट होईल या भीतीनं काल रात्रीपासून माझी झोप उडाली आहे.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, America, Protest, Taliban