GOOD NEWS! अखेर कोरोनावर औषध सापडलं, 'या' देशात सुरू आहे चाचणी

GOOD NEWS! अखेर कोरोनावर औषध सापडलं, 'या' देशात सुरू आहे चाचणी

कोरोनामुळे जगभरात 9 हजाराहून अधिक लोकांच्या मृत्यूनंतर अखेर या विषाणूला हरवण्यासाठी औषध सापडले आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 20 मार्च : कोरोना विषाणूमुळे जगभरात 9 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे कोरोनाची दहशत वाढली आहे. मात्र अद्याप कोरोनाला हरवण्यासाठी औषध सापडले नाही आहे. दरम्यान, अमेरिकेने कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी मलेरिया औषधास मान्यता दिली आहे.

चीनच्या वुहानमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूने जगात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूने लोकांचे जीव घेतले आहे. याआधी कोरोनाच्या लसीची चाचणी सध्या अमेरिकेत सुरू आहे. असे असताना अमेरिकेने कोरोना विषाणूच्या उपचारांसाठी मलेरियाच्या औषधास मान्यता दिली आहे.

वाचा-इटलीमध्ये 3405 लोकांचा मृत्यू, लष्काराचे जवान करत आहेत मृतांचे अंत्यसंस्कार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, कोरोना विषाणूच्या उपचारांसाठी मलेरिया औषधास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती देत, मलेरिया आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विन नावाच्या औषधाने कोरोना विषाणूच्या उपचारात बरेच चांगले परिणाम दर्शविले आहेत. त्यामुळं अमेरिकेत सध्या याबाबत चाचणी करून इतर देशांनाही हे औषध देण्यात येईल.

वाचा-धक्कादायक! उल्हासनगरमधील कोरोनाग्रस्त महिला आली होती 1500 लोकांच्या संपर्कात

जगात कोरोनाचा संसर्ग वाढला

जगात सुमारे 2 लाख लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या व्यतिरिक्त कोरोना विषाणूमुळे 9 हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच वेळी, भारतात कोरोना विषाणूची प्रकरणे सतत वाढली आहेत. भारतात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.

वाचा-पाकने उघडली कोरोनाची नर्सरी! आतापर्यंतचा सर्वात भयंकर VIDEO

इटली कोरोनाचे नवे केंद्र

इटलीमध्ये मृत्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या चीनपेक्षा इटलीमध्ये मृतांची संख्या जास्त आहे. एकाच दिवशी इटलीमध्ये 427 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. यामुळे इटलीमधील मृतांचा आकडा 3405 झाला आहे. तर, 3245 लोकांची परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनाचा कहर पाहता 12 मार्च पासून इटलीमध्ये लॉकडाउन सुरू आहे, आता हाच लॉकडाऊन अनिश्चित काळासाठी वाढविण्यात आला आहे. इटलीमधील जवळपास सर्व लोकांना त्यांच्या घरी रहाण्यास सांगितले गेले आहे. सध्या कोरोनामुळे 41 हजाराहून अधिक लोक संक्रमित आहेत.

First published: March 20, 2020, 10:18 AM IST

ताज्या बातम्या