फ्लोरिडात पादचारी पूल कोसळला; 7 जण ठार, 8 जखमी

फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिर्व्हसिटीमध्ये गुरुवारी नव्याने बांधलेला पादचारी पूल कोसळल्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 16, 2018 09:10 AM IST

फ्लोरिडात पादचारी पूल कोसळला; 7 जण ठार, 8 जखमी

16 मार्च : फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिर्व्हसिटीमध्ये गुरुवारी नव्याने बांधलेला पादचारी पूल कोसळल्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. पुलाच्या ढिगाऱ्यातील अनेक वाहने दाबली गेली आहेत. या अपघातात किमान 4 जणांचा मृत्यू झालाय तर या 950 टन वजनाच्या पूलखाली 6 वाहनं अडकली आहेत. या अपघातात 8 जखमींना रुग्णायलात दाखल करण्यात आलं आहे.

पुलाखाली अडकलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी आपत्कालीन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कुत्र्यांच्या मदतीने शोध लावला सुरू केला आहे. ज्या रस्त्यावर हा पुल बांधला गेला होता त्या रस्त्यावर दिवभर वाहनांची रहदारी असते. त्यामुळे यात मोठ्याप्रमाणात जीवित हानी झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

फ्लोरिडा महामार्गावर असलेल्या पेट्रोलपंप अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या अपघातात अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत परंतु यांची एकूण अकडेवारी आता सांगता येणार नाही.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2018 09:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close