Home /News /videsh /

कोण कोरोना, कुठला कोरोना? या लोकांना माहितच नाही Coronavirus! लस देण्यासाठी पोहोचली मेडिकल टीम पण...

कोण कोरोना, कुठला कोरोना? या लोकांना माहितच नाही Coronavirus! लस देण्यासाठी पोहोचली मेडिकल टीम पण...

तुम्हाला असं सांगितलं की काही लोकांना अद्याप कोरोना काय आहे हे माहितच नव्हतं, तर खरं वाटेल का? पण हो, अ‍ॅमेझॉनच्या जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजाला याबाबत माहितीच नव्हती.

    04 नोव्हेंबर: 2019 पासूनच कोरोना व्हायरस नावाच्या संकटाने (Coronavirus Pandemic) जगाला वेढा घातला आहे. या ना त्या प्रकारे या पँडेमिकमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive Cases) आल्याने म्हणा किंवा कोरोना लॉकडाऊन काळात नोकरी गेल्याने, पैशांच्या अडचणीमुळे अनेकांपुढे समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र जेव्हा जगभरात लसीकरणाची (Coronavirus Vaccination) प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी काही प्रमाणात या व्हायरसची भीती कमी झाली आहे. त्यापूर्वी सर्वांना घरात बसवून ठेवण्यात हा विषाणू यशस्वी झाला होता. दरम्यान तुम्हाला असं सांगितलं की काही लोकांना अद्याप कोरोना काय आहे हे माहितच नव्हतं, तर खरं वाटेल का? पण हो, अ‍ॅमेझॉनच्या जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजाला याबाबत माहितीच नव्हती. पेरुमधील मेडिकल टीमने अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील आदिवाशांना लस देण्याचा निर्णय घेतला होता. तीन दिवस बोटीने प्रवास करत ही टीम याठिकाणी असणाऱ्या गावात पोहोचली. त्यावेळी त्यांना समजले की त्यांनी पहिल्यांदाच कोरोनाचे नाव ऐकले आहे. हे वाचा-दिवाळीच्या पहिल्या दिवशी Good News, 'या' सिंगल लसीचा डोस करतोय Coronaचा धोबीपछाड अॅमेझॉनच्या जंगलात राहणाऱ्या या समुदायाबाबत जगाला तशी फारशी माहिती नाही. ते गेल्या अनेक शतकांपासून जंगलाच्या मध्यभागी राहतात. जेव्हा टीमने त्यांना लसीबद्दल सांगितले तेव्हा पहिल्यांदाच त्यांनी कोरोनाचे नाव ऐकले. गेल्या दोन वर्षांपासून जगाला उद्ध्वस्त करणाऱ्या कोरोनाची माहितीही या समाजाला नाही, हे मेडिकल टीमसाठी खूप धक्कादायक होते. मात्र, टीमने या आदिवासींना कोरोनाबाबत समजावले तेव्हा त्यांनी लसीकरण करून घेण्यास होकार दिला. पेरू अशा देशांपैकी एक आहे जिथे कोरोनाने खूप दहशत निर्माण केली आहे. याठिकाणी मृतांची संख्या खूप जास्त होती. परंतु या समाजातील लोकं अनेक शतकांपासून उर्वरित जगापासून दूर आहेत. अशा परिस्थितीत खरं म्हटलं तर साथीच्या आजाराचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नव्हता. हा समाज जगापासून अनेक शतकांपासून आयसोलेट आहे, त्यामुळे कोरोना काळात त्यांना वेगळ्या प्रकारे आयसोलेट होण्याची आवश्यकता भासली नाही. हा समाज अॅमेझॉनच्या जंगलाच्या मध्यभागी राहतो. वैद्यकीय पथकाला त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तीन दिवस लागले होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Corona, Corona vaccination, Corona vaccine

    पुढील बातम्या