अबब…फक्त 10 सेकंदात केली 71 हजार कोटींची विश्वविक्रमी विक्री

अबब…फक्त 10 सेकंदात केली 71 हजार कोटींची विश्वविक्रमी विक्री

फक्त 10 सेकंदात 71 हजार कमवणारी ही कंपनी आहे तरी कोणती?

  • Share this:

बिजिंग, 13 नोव्हेंबर : अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार तणाव वाढत असताना दुसरीकडे इ-कॉमर्स कंपन्या मात्र खोऱ्यानं पैसे कमवत आहेत. मात्र अशा परिस्थिती एक कंपनी 71 हजार कोटींची विश्विविक्रमी करेल असा विचारही आपण करणार आहे. यातच चीनमधील सर्वात मोठी इ-कॉमर्स कंपनी अलिबाबा या कंपनीनं हा कारनामा करून दाखवला आहे. या कंपनीनं सिंगल्स डे सेलमध्ये (Single's Day Sale) तब्बल 38.38 अरब डॉलरची(2.72 लाख कोटी) विक्रमी विक्री केली आहे.

अलिबाब समूहाच्या विविध ऑनलाईट प्लॅटफॉर्मवर 29.45 सेकंदात 10 अरब डॉलरची (71 हजार कोटी) विक्री केली आहे. त्यांनी गेल्या वर्षी 16 तास 31 मिनीटांमध्ये अशी विक्रमी विक्री केली होती. सिंगल्स डे सेल (Single's day sale) या कार्यक्रमात 24 तासात 268.4 अरब आरएमबी (चीनी मुद्रा) म्हणजेच 38.379 अरब डॉलरची विक्री झाली आहे.

वाचा-सावधान! तुम्हाला रात्री झोप येत नाही, आजच बदला या सवयी नाहीतर...

अलिबाबा या कंपनीनं गेल्या वर्षीपेक्षा यंदा विक्रीमध्ये 25.7 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले. तसेच, या दिवशी डिलेव्हरी ऑर्डरची संख्या आता 1.292 अरबपर्यंत पोहचली आहे.

वाचा-भारतातील ही शहरं बुडताना पाहिलं सध्याची पिढी, यात मुंबईच्याही नावाचा उल्लेख

सध्या अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमध्ये व्यापार तणाव आहे. असे असले तरी अलिबाबनं केलेली 71 हजार कोटींची विक्री ही लोकांच्या नजरा खेचणारी आहे. अलिबाबाच्या टीमॉल प्लॅटफार्म आणि ताओबाओचे अध्यक्ष फैन जियांगने, 'आम्ही नवीन विक्री आणि ग्राहक संख्यांमध्ये झालेल्या वाढीमुळे खुश आहोत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा ही वाढ 25 टक्क्यांनी झाली आहे', असे सांगितले.

वाचा-इथे आधार कार्डचा नंबर वापरताना घ्या खबरदारी, नाहीतर होईल 10 हजार रुपयांचा दंड

अलिबाब टीमॉस प्लॅटफॉर्म चीन आणि इतर आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड यांची कंपनी ते ग्राहक (बीटूसी) अशी विक्री करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. चीनमध्ये या कंपनीचे मोठे मार्केटप्लेस आहे. तर, याच कंपनीची ताओबाओ ही येथील प्रमुख ऑनलाईन विक्री करणारी मोठी कंपनी आहे. या कंपनीचे सर्व अधिकार सध्या अलिबाबाकडे आहेत.

First published: November 13, 2019, 7:39 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading