• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • अल कायदा आणि इस्लामिक स्टेट ठरणार जगासाठी डोकेदुखी? अमेरिकेनं सुरू केली मोठी तयारी

अल कायदा आणि इस्लामिक स्टेट ठरणार जगासाठी डोकेदुखी? अमेरिकेनं सुरू केली मोठी तयारी

अफगाणिस्तानात तालिबानचं सरकार (Taliban Government in Afghanistan) स्थापन झाल्यानंतर आता अमेरिकेनं (America) दहशतवादी संघटना अलकायदा आणि ISIS च्या धोक्याला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 19 सप्टेंबर : अफगाणिस्तानात तालिबानचं सरकार (Taliban Government in Afghanistan) स्थापन झाल्यानंतर आता अमेरिकेनं (America) दहशतवादी संघटना अलकायदा आणि ISIS च्या धोक्याला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. अफगाणिस्तानातून परदेशी सैन्य माघारीनंतर या आठवड्याच्या अखेरीस अमेरिकेचे शीर्ष लष्करी अधिकारी ग्रीसमध्ये नाटो समकक्षांसोबत बैठक करणार आहेत. या बैठकीचा हेतू अमेरिका आणि क्षेत्रासाठी दहशतवादी संघटनांकडून (Terrorist Organizations) असलेला संभाव्य धोका पाहता सहकार्य वाढवणे, गुप्तचर आणि इतर बाबींची देवाणघेवाण करणे हा आहे. पंजाब काँग्रेसमध्ये भूकंप, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह राजीनामा देणार? जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष मिलिटरी जनरल मार्क मिल्ले म्हणाले की, नाटोच्या (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) सदस्य देशांचे संरक्षण प्रमुख अफगाणिस्तानातून युतीचे सैन्य पूर्णपणे काढून घेतल्यानंतर पुढील पावलांवर लक्ष केंद्रित करतील. अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारमुळे अल कायदा आणि आयएस पुन्हा एकदा डोके वर काढू शकतात आणि अमेरिकेसह जगातील देशांना लक्ष्य करू शकतात. अनेक गुप्तचर अहवालांमध्ये अशा गोष्टी समोर आल्या आहेत. मार्क मिल्ले, अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन आणि अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की अल कायदा किंवा इस्लामिक स्टेट अफगाणिस्तानात पुन्हा पाय रोवू शकतात आणि अमेरिकेला एक किंवा दोन वर्षात धोका निर्माण करू शकतात. अमेरिकन लष्करानं म्हटलं आहे, की दहशतवादविरोधी पाळत ठेवण्याची व्यवस्था केली जाऊ शकते आणि गरज पडल्यास अफगाणिस्तानातील दहशतवादी तळांवर इतर देशांच्या लष्करी तळांवरून कारवाई केली जाऊ शकते. अफगाणिस्तानबाबत भारताची भूमिका काय?, पंतप्रधान मोदींनी केलं स्पष्ट अधिकार्‍यांनी स्पष्ट केलं, की पार्शियन आखातातील लष्करी तळांवरील टोही विमानांची लांब पल्ल्याची क्षमता मर्यादित आहे. अशा परिस्थितीत, अफगाणिस्तानच्या जवळील देशांच्या लष्करी तळांशी संबंधित करार, एकमेकांच्या हद्दीत विमाने उडवण्याचा अधिकार देणे, गुप्तचर माहिती शेअर करणे यावर चर्चा होऊ शकते. अलिकडच्या काही महिन्यांत लष्करी तळांवर कोणताही करार झालेला नाही. मार्क मिल्ले म्हणाले की, ते त्यांच्या समकक्षांशी या मुद्द्यांवर चर्चा करतील. ग्रीसचे संरक्षण मंत्री निकोलस पनागियोटोपौलोस म्हणाले की, या गटाने सर्वप्रथम अफगाणिस्तानमध्ये राहणारे लोक सुरक्षित राहतील आणि तेथे कोणतेही मानवतावादी संकट येणार नाही याची खात्री केली पाहिजे.
  Published by:Kiran Pharate
  First published: