Elec-widget

पाकिस्ताननं केलं एक नेक काम! भारतीय विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं

पाकिस्ताननं केलं एक नेक काम! भारतीय विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं

भारतीय विमान अपघातग्रस्त होण्यापासून वाचलं आणि त्यासाठी पाकिस्तानी एअर कंट्रोल रूमनं महत्त्वाची कामगिरी बजावली.

  • Share this:

कराची, 16 नोव्हेंबर : भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध सध्या ताणले गेलेले आहेत. पाकिस्तानने आपली एअरस्पेसही भारतीय विमानांसाठी मध्यंतरी बंद केली होती. ती काही महिन्यापूर्वीच खुली केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी घडलेला एक प्रसंग नुकताच उघड झाला आहे. भारतीय विमान अपघातग्रस्त होण्यापासून वाचलं आणि त्यासाठी पाकिस्तानी एअर कंट्रोल रूमनं महत्त्वाची कामगिरी बजावली.

पाकिस्तान नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरने भारतीय वैमानिकाला वेळीच इशारा दिल्यामुळे भारतीय विमान एका मोठ्या अपघातापासून वाचलं.

द न्यूज इंटरनॅशनलने दिलेल्या बातमीनुसार जयपूरहून ओमानची राजधानी मस्कतला जाणारं नागरी विमान पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून उडत होतं. त्या वेळी हवामान खराब झालं. 36000 फूट उंचीवरून विमान उडत असताना अचानक विमानावर वीज पडली. विमान अचानक 34000 फूट खाली आलं. त्याच वेळी पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरने वैमानिकाला इशारा दिला आणि विमान भरकटण्यापासून वाचलं.

पाकिस्तानच्या एअरस्पेसमधून भारतीय विमानं जायला जुलैपासून परवानगी देण्यात आली. बालाकोट सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानने लावलेले निर्बंध जुलैअखेर सैल केले. त्याअगोदर 5 महिने पाकिस्तानवरून उडायला भारतीय विमानांवर बंदी होती.

----------

Loading...

अन्य बातम्या

भाजपचं पुढचं लक्ष्य ठरलं; चिंतन बैठकीतली Inside Story

सत्तासंघर्ष सुरू असताना भाजपचा 'प्लान बी', पक्षाचं लक्ष आता स्थानिक निवडणुकांवर

आमचंच सरकार येणार म्हणणाऱ्या भाजपचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2019 04:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com