मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अफगाणिस्तानवर कब्जा मात्र अजूनही तालिबानला पंजशीर जिंकता आलं नाही; हा व्यक्ती देतोय लढा

अफगाणिस्तानवर कब्जा मात्र अजूनही तालिबानला पंजशीर जिंकता आलं नाही; हा व्यक्ती देतोय लढा

तालिबाननं अहमद मसूद आणि अमरुल्ला सालेह यांना आत्मसमर्पण करण्याचा अन्यथा गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. यावर बोलताना अहमद मसूद (Ahmad Massoud) म्हणाले, की ते आपल्या  ताब्यातील क्षेत्रात तालिबानच्या समोर सरेंडर करणार नाहीत.

तालिबाननं अहमद मसूद आणि अमरुल्ला सालेह यांना आत्मसमर्पण करण्याचा अन्यथा गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. यावर बोलताना अहमद मसूद (Ahmad Massoud) म्हणाले, की ते आपल्या ताब्यातील क्षेत्रात तालिबानच्या समोर सरेंडर करणार नाहीत.

तालिबाननं अहमद मसूद आणि अमरुल्ला सालेह यांना आत्मसमर्पण करण्याचा अन्यथा गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. यावर बोलताना अहमद मसूद (Ahmad Massoud) म्हणाले, की ते आपल्या ताब्यातील क्षेत्रात तालिबानच्या समोर सरेंडर करणार नाहीत.

काबूल 23 ऑगस्ट : तालिबानने (Taliban in Afghanistan) पंजशीर खोऱ्यावर (Panjshir valley) विजय मिळवण्याची मोहीम सुरू केली आहे, जे आतापर्यंत तालिबानच्या ताब्यात आलेली नाही. तालिबाननं अहमद मसूद आणि अमरुल्ला सालेह यांना आत्मसमर्पण करण्याचा अन्यथा गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. यावर बोलताना अहमद मसूद (Ahmad Massoud) म्हणाले, की ते आपल्या ताब्यातील क्षेत्रात तालिबानच्या समोर सरेंडर करणार नाहीत.

दुबईस्थित अल-अरेबिया वाहिनीशी बोलताना अहमद मसूद म्हणाले, की त्यांना देशात एक समग्र सरकार हवे आहे. ज्यात तालिबानसह इतर पक्षांनीही सहभागी व्हावे. यासाठी तालिबानला सर्व पक्षांशी वाटाघाटी करावी लागेल. अहमद मसूद (Ahmad Massoud) यांनी ताकीद दिली की जर तालिबानने चर्चेची ऑफर नाकारली तर त्यांच्याशी संघर्ष होण्याची शक्यता आहे.

संतापजनक : "तालिबानी हे महिलांच्या प्रेतावरही बलात्कार करतात!''

अहमद मसूद पंजशीरचा (Panjshir valley) सिंह म्हटल्या जाणाऱ्या अहमद शाह मसूदचा मुलगा आहे. अहमद शाह मसूदची अल कायदा आणि तालिबानने सुमारे 20 वर्षांपूर्वी बॉम्बस्फोटात हत्या केली होती. तालिबान्यांनी संपूर्ण देशावर कब्जा (Taliban Regains Control of Afghanistan) केल्यानंतर आता केवळ अहमद मसूदच्या नेतृत्वाखालील पंजशीर प्रांत बाकी आहे.

अहमद मसूद म्हणाले की, तालिबानशी लढण्यासाठी सरकारी सुरक्षा दले पंजशीर खोऱ्यात एकत्र येत आहेत आणि एक मजबूत मोर्चा तयार केला जात आहे. मसूदने तालिबानविरुद्ध लढण्यासाठी फ्रान्स, युरोप, अमेरिका आणि अरब देशांना मदतीचं आवाहन केलं आहे. अहमद मसूद म्हणाले, की त्यांनी या देशांसाठी 20 वर्षांपूर्वी सोव्हिएत रशिया आणि तालिबानशी लढा दिला होता. आता त्यांना त्यांच्या देशाला मुक्त करण्यासाठी मदतीची गरज आहे. त्यामुळे या देशांनी पुढे यायला हवे.

अफगाणिस्तान क्रिकेट खेळणार का नाही? तालिबानच्या निर्णयाची सगळ्यात मोठी Update

मसूद म्हणाले, 'मी या सर्व देशांना सांगितलं की पूर्वीप्रमाणे आमच्या स्वातंत्र्याच्या या युद्धात पुन्हा एकदा आमची मदत करा. काहीप्रमणात कटुता आली असली तरी, या सर्व देशांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. 1940 मध्ये ज्याप्रमाणे युरोपीय देश पराभूत अवस्थेत होते, तशीच आज आमची परिस्थिती आहे. तालिबानने पंजशीर खोरे वगळता संपूर्ण अफगाणिस्तान व्यापला आहे. केवळ आम्हीच त्यांच्या विरोधात उभे आहोत. जे लोक त्यांच्यासमोर हारले आहेत ते आता तालिबानला सहकार्य करण्याबद्दल बोलत आहेत. मात्र असं असूनही आम्ही नतमस्तक होणार नाही.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, Taliban