ताइपे, 22 ऑगस्ट : चीन जरी तायवानला (Taiwan) सैन्यशक्ति दाखवून त्याला जिंकण्याचा प्रयत्न करीत असली तरी ताइपे माघार घेण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. तायवानच्या सेनेने हे स्पष्ट केलं आहे की ते जरी शत्रूत्व वाढवित नसले तरी त्यांच्या देशाच्या विरोधात आल्यास कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही.
सांगितले जात आहे की, गेल्या काही दिवसांपासून चीनने (China) साऊथ चीनच्या समुद्रातील तायवानच्या भागात हक्क दाखविण्यासाठी युद्धाभ्यासाच्या नावावर हजारो सैनिक उतरवले आहेत. आणि या याचं प्रत्युत्तर देण्यासाठी तायवानेही तब्बल 200 मरीश कमांडोजच्या एका कंपनीला प्रसात द्विपवर पाठविले आहे.
तायवानच्या सेनेनेदेखील आपल्या महत्त्वाकांक्षीपणाची एक झलक दाखवली आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओसह लिहिले आहे की - 'आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी आम्ही कोणतीच कमी राहू देणार नाही. आमची सेना कोणाशीही शत्रूत्व करणार नाही मात्र कोणी हालचाल केली तर प्रत्युत्तर नक्की देईल.' यापूर्वी गेल्या आठवड्यात तायवान सेनाने ट्विट केलं होतं की - 'तायवान स्ट्रेटमध्ये PLA च्या हालचालींवर मीडिया रिपोर्ट्सच्या उत्तरादाखल तायवानची सेना त्या भागाचा सक्रियपणे सर्विलांस करीत आहे. संप्रभुताचं रक्षण करण्याची क्षमता असून क्षेत्रीय स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी क्रॉस-स्ट्रेटमध्ये शांती अत्यंत आवश्यक आहे. '
दुसरीकडे भारताने चीनला आता आणखी एक दणका दिला असून 44 वंदे भारत ट्रेन्सचं टेंडर रद्द केलं आहे. काही भारतीय कंपन्यांनी चिनी कंपन्यांच्या मदतीने हे टेंडर्स टाकले होते ते सर्व टेंडर्स आता रद्द करण्यात आले आहेत. त्याचा चिनी कंपन्यांना चांगला फटका बसणार आहे. ‘वंदे भारत’ ट्रेन्स अंतर्गत या ट्रेन्स चालविण्यात येणार होत्या. मात्र आता हे टेंडर्स रद्द करून आता ते दुसऱ्या कंपन्यांना दिले जाणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China