Home /News /videsh /

Russia-Ukrain war : छातीवर लिहिलं 'युद्ध थांबवा'; पुतिन यांच्याविरोधात Topless झालेल्या या महिला कोण आहेत?

Russia-Ukrain war : छातीवर लिहिलं 'युद्ध थांबवा'; पुतिन यांच्याविरोधात Topless झालेल्या या महिला कोण आहेत?

फोटो सौजन्य - Getty

फोटो सौजन्य - Getty

रशियन दूतावासाबाहेर टॉपलेस होऊन पुतिन यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या या महिलांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

    माद्रिद, 04 मार्च : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे (Russia-Ukrain war) पडसाद जगभर उमटत आहेत. युक्रेनविरोधात युद्ध छेडणाऱ्या रशियाविरोधात जगातील वेगवेगळ्या देशांत आंदोलनं केली जात आहेत. रशियन दूतावासांबाहेर लोक मोर्चे काढत आहेत. अशात एका आंदोलनाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काही महिलांनी टॉपलेस होत आंदोलन केलं आहे. युद्ध थांबवा असं म्हणत पुतिन यांच्याविरोधात या टॉपलेस महिला रस्त्यावर उतरल्या आहेत (Topless Woman Protest against putin). स्पेनच्या माद्रिदमध्ये 3 मार्च 2022 ला त्यांनी रशियन दूतावासाबाहेर या महिलांनी टॉपलेस होत आंदोलन केलं. हातात पुष्पगुच्छ, डोक्यात फुलं आणि छातीवर  पुतिनचं युद्ध बंद करा, युक्रेनसाठी शांती, युद्ध थांबवा अशी घोषवाक्ये लिहून या महिला रस्त्यावर आल्या. या महिला कोण आहेत, पुतिन यांच्याविरोधात त्यांनी असं आंदोलन का छेडलं आहे, असे बरेच प्रश्न या वेगळ्या आंदोलनामुळे पडले आहेत. पुतिन यांच्याविरोधात निर्वस्त्र अवस्थेत आंदोलन करणाऱ्या या महिला  फिमेन नावाच्या फेमिनिस्ट समूहाशी संबंधित आहेत. फिमेनची स्थापना 2008 साली युक्रेनमध्ये झाली होती. आता हा समूह फ्रान्समध्ये काम करतो आहे. 'माझं शरीर माझं शस्त्र' असं फिमेनचं स्लोगन आहे.  सेक्स्ट्रीमिज्म, एथिज्म आणि फेमिनिज्मवर ते आपली भूमिका मांडतात. आंदोलन हेच आमचं मिशन आणि खुली छाती हेच आमचं शस्त्र आहे, असं फिमेन म्हणतात. महिलांच्या अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं लक्ष्य आहे, असा दावा हा समूह करतो. आक्रमक कॅम्पेन आणि डिजीटल माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवण्याचा हा समूह प्रयत्न करतो. हे वाचा - युक्रेनमध्ये विध्वंस करण्यापाठीमागे पुतीनची सिक्रेट आर्मी, एका महिलेचाही आहे हात द सनच्या रिपोर्टनुसार बऱ्याच कालावधीपासून फिमेन रशियाचा विरोध करत आहे. रशियाने युक्रेनला धमकी दिल्याने हा समूह आधीपासून रशिया आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात आहेत. युक्रेनवर दबाव टाकणाऱ्या रशियाविरोधात फिमेनने 2012 साली एक वक्तव्य जारी केलं होतं. युरोपियन युनियनवरही हा ग्रुप टिका करत आला आहे. युरोपियन युनियनमध्ये असलेल्या देशांनी रशियासोबत राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध तोडावेत अशी मागणीही त्यावेळी केली होती. हे वाचा - जीव वाचवण्यासाठी भारतीय विद्यार्थी जाळतायेत स्वतःच सामान! 2013 साली जर्मनीत ट्रेड फेअर सुरू होता. तेव्हा तत्कालीन जर्मन चान्सलर एंजिला मर्कल यांच्यासोबत व्लादिमीर पुतिनही सहभागी झाले होते. पुतिन तिथं येताच फिमेन समूहातील महिला टॉपलेस झाल्या होत्या आणि पुतिन यांना विरोध केला होता. जगातील सर्वात मोठ्या हुकूमशाहाविरोधात हे महिलांचं अहिंसक आंदोलन आहे, असं त्यावेळी फिमेनच्या सदस्य ओलेक्जँड्रा शेवचेन्को म्हणाल्या होत्या.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Protest, Russia, Russia Ukraine, Russia's Putin, World news

    पुढील बातम्या