भारताच्या केवळ इशाऱ्यानं पाक घाबरलं; मसूदला सुरक्षित स्थळी हालवलं

भारतानं केवळ इशारा देताच पाकिस्ताच्या तोंडचं पाणी पळालं आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2019 02:20 PM IST

भारताच्या केवळ इशाऱ्यानं पाक घाबरलं; मसूदला सुरक्षित स्थळी हालवलं

दिल्ली,21 फेब्रुवारी : पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना कडक शब्दात इशारा दिला. भारताच्या केवळ इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरलं असून त्यांनी आता दहशतवादी मसूद अझरच्या सुरक्षेत वाढ केली आहे. शिवाय, त्याला रावळपिंडी येथे सुरक्षित स्थळी हालवण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे राळपिंडी येथे ISIचं हेडक्वार्टर आहे. भारतानं केवळ इशारा दिल्यानंतर ISI या पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेनं मसूदच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

पुलवामा हल्ल्यामध्ये पाकिस्तानची गुप्तचर संघटना असलेल्या आयआयआयचा हात होता. शिवाय, जैश - ए - मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी देखील स्वीकारला आहे. अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करा अशी मागणी आता फ्रान्सनं संयुक्त राष्ट्रसंघात करणार आहे. त्यावरती आता चीनची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे.

आणखी मोठ्या हल्ल्याची तयारी

पुलवामा येथे आत्मघातकी हल्ला केल्यानंतर आता दहशतवादी पुन्हा एकदा भारतीय सैन्याला लक्ष्य करण्याच्या तयारीमध्ये आहे. जैश - ए - मोहम्मह ही दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतीय सैन्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. दहशतवाद्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करण्यासाठी जैश - ए - मोहम्मद पुलवामा हल्ल्याचा व्हिडीओ देखील जारी करण्याच्या तयारीत आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जैश - ए - मोहम्मदनं 500 किलो स्फोटकं या हल्ल्यासाठी तयार ठेवली आहेत. शिवाय, आत्मघातकी हल्ल्यासाठी वापरली जाणारी गाडी देखील तयार ठेवण्यात आली आहे. तसेच जम्मू - काश्मीर किंवा बाहेर देखील हा हल्ला केला जाऊ शकतो. या संभाव्य हल्ल्याबद्दल लष्कराला सतर्क करण्यात आलं आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते.

Loading...

आयएसआयची मदत

पुलवामा हल्ला करण्यामागे आयएसआय पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेनं दहशतवाद्यांना मदत केली होती. त्यामुळे पुलवामा येथे हल्ला झाला होता. सध्या एनआयए या दहशतवादी हल्ल्याचा तपास करत आहे.

VIDEO: आर्ची देतेय 12 वीची परीक्षा; पाहिलं का तुम्ही?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 02:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...