Home /News /videsh /

धक्कादायक! दोन मांजरांना कोरोनाची लागण, रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

धक्कादायक! दोन मांजरांना कोरोनाची लागण, रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

अमेरिकेत वाघिणीला कोरोना झाल्यानंतर आता मांजरांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे.

    न्यूयॉर्क, 23 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जवळपास पावणे दोन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोकांवर उपचार सुरू आहे. कोरोना व्हायरस माणसांपासून आता प्राण्यांमध्ये संसर्ग झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. याआधी एका वाघिणीला कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. आता आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मांजरीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. वाघिणीला कोरोना झाल्यानंतर बुधवारी न्यूयॉर्कमध्ये दोन मांजरींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मांजरांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची अमेरिकेतील ही पहिली घटना आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही मांजरींना आधी श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं दवाखान्यात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्यांची चाचणी केली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या मांजरींच्या मालकाला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्याच्याकडून या मांजरींनाही कोरोना झाला आहे. हे वाचा : घरी पोहोचण्यासाठी मजुरांची मोठी जोखीम, रस्ता सापडला नाही म्हणून नदीत मारली उडी या घटनेमुळे कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या पाळीव प्राण्यानां देखील आता कोरोनाचा धोका आहे हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. याआधी अशाच पद्धतीनं एका वाघिणीला कोरोना झाल्याची माहिती मिळाली होती. दुसऱ्या मांजर मात्र कोणत्याही कोविड-19च्या संपर्कात आली नाही तरीही तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. स्पर्शातून किंवा श्वसनातून हा संसर्ग पसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे वाचा : लॉकडाऊनमुळे झालं लग्न! मुलीला भेटायला गेला आणि तिच्याच घरी अडकला, 30 दिवसानंतर.. संपादन - सूरज यादव
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या