Home /News /videsh /

अंघोळ केल्यानंतर चार्जिंगला लावलेला मोबाइल घेऊन बेडवर झोपली; सकाळी मिळाला मृतदेह!

अंघोळ केल्यानंतर चार्जिंगला लावलेला मोबाइल घेऊन बेडवर झोपली; सकाळी मिळाला मृतदेह!

तरुणीला मृतावस्थेत पाहून परिसरात खळबळ उडाली आहे.

    नवी दिल्ली, 31 जुलै : एका 17 वर्षांची मुलगी आपला मोबाइल चार्जिंगला लावून झोपली. ती जेव्हा झोपली तेव्हा मोबाइल हा तिच्या अंगाखाली होता. सकाळी मात्र ती उठत नसल्याचं पाहून अनेकांना धक्का बसला. तिचा त्यावेळी मृत्यू झाल्याचं समोर आलं. द मिररमधील वृत्तानुसार, ही घटना कंबोडियातील आहे. येथील क्रेटी भागात 17 वर्षांची तरुणी आपल्या फोनवर मृतावस्थेत दिसली. ती एका गोल्ड मायनिंग कंपनीत चिनी अनुवादक म्हणून काम करीत होती. अंघोळ केल्यानंतर बेडवर झोपली अन्... मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने आधी अंघोळ केली आणि ती बेडवर झोपली. यावेळी तिने मोबाइल फोन चार्जिंगला लावला होता. तिच्या मोबाइलचा टॉर्चदेखील ऑन होता. चार्जिंगदरम्यान तिला झोप लागली. झोपतच विजेचा झटका लागल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जुलै रोजी झोपतच विजेचा झटका लागल्यामुळे तरुणीचा झोपतच मृत्यू झाला. करंट लागण्यापूर्वी तिने अंघोळ केली होती. तिच्या बेडजवळच सॉकेट होतं. तिने त्यात मोबाइल चार्ज करण्यासाठी लावला. या घटनेनंतर देशभरात फोनच्या चार्जरविषयी चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर याबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. मोबाईल चार्जिंगबाबत ही काळजी घ्या 1) मोबाइलचा कंपनीने दिलेला चार्जर खराब झाल्यानंतर अनेकदा जवळच्या दुकानात, बाजारात मिळणारा चार्जर खरेदी केला जातो. अशा चार्जरचा फटका बसू शकतो. बॅटरी खराब होण्यास तसंच फोन गरम होण्यासाठी असे चार्जर कारणीभूत ठरतात. त्यामुळे कंपनीच्या ओरिजनल चार्जरचाच वापर कऱणं योग्य ठरेल. 2) चार्जिंग संपत आल्यावर फोन चार्जिंगला लावून त्याचा वापर करण्याची सवय काही लोकांना असते. तसेच एकाच वेळी अनेक अॅप वापरण्याचीही सवय असते. काहीवेळा मोबाइल चार्जिंगला लावूनच गेम खेळत बसलेले दिसतात. तसंच मोबाइल कॉल सुद्धा केले जातात. अशावेळीही मोबाइल गरम होऊ शकतो तसेच स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा गोष्टी टाळा. 3) काही जणांना रात्रभर मोबाइल चार्जिंग करण्याची सवय असते. असं कऱणं धोकादायक ठरू शकते. यामुळे फोन आणि बॅटरी दोन्ही खराब होण्याची शक्यता असते. रात्रभर मोबाइल चार्जिंग कऱण्याएवजी ठराविक वेळ चार्जिंग कऱणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य असते. 4) तुमचा फोन ज्वलनशील पदार्थांपासून दूर ठेवा. कपडे, कॉटन, प्लास्टिकपासून बाजूला ठेवा. तसेच शर्टच्या खिशात मोबाइल ठेवणं टाळा. त्यातून निघणारे रेडिएशन शरीरासाठी घातक असतात.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mobile, Mobile Phone

    पुढील बातम्या