Home /News /videsh /

बँकेची मालकीणचं 68 कोटींची कॅश घेऊन प्रायव्हेट जेटने फरार; तिजोरी पाहून कर्मचारी हादरले!

बँकेची मालकीणचं 68 कोटींची कॅश घेऊन प्रायव्हेट जेटने फरार; तिजोरी पाहून कर्मचारी हादरले!

यावेळी महिला भली मोठी कॅश घेऊन प्रायव्हेट जेटने परदेशात निघून गेली.

    नवी दिल्ली, 31 जुलै : एका महिलेने आपल्या सहकाऱ्यासोबत स्वत: काम करीत असलेल्या बँकेत लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिने बँकेतून तब्बल 68 कोटी रुपये चोरले आणि त्याऐवजी कागदाचे तुकडे भरून ठेवले. या प्रकारानंतर महिला प्रायव्हेट जेटमधून परदेशात फरार झाली. घटनेच्या चार वर्षांनंतर अखेर आरोपी महिलेला पुन्हा देशात आणण्यात आलं आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, इनेसा ब्रांडेनबुर्ग या बँकेत काम तर करीतच होती, शिवाय ती बँक मालकांपैकी एक होती. तिचा सहकारीही याच बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सपैकी एक होता. याचाच अर्थ दोघे बँकेच्या उच्च अधिकाऱ्यांमध्ये सामील होते. यासाठी सुरुवातीला कोणालाच त्यांच्यावर संशय झाला नाही. 2018 मध्ये इनेसाने ट्यूमेनच्या Siberian Bank For Reconstruction and Development च्या तिजोरीतून तब्बल 68 कोटी 49 लाख रुपये चोरले. त्याऐवजी स्टेशनरीचं सामान भरलं. जोपर्यंत याचा खुलासा झाला, तोपर्यंत प्रायव्हेट जेटने त्या फरार झाल्या होत्या. मात्र चार वर्षांनंतर त्यांना स्पेनमधून पकडण्यात आलं आणि सुनावणीसाठी पुन्हा देशात नेण्यात आलं. या लुटीच इनेसा एकटी नव्हती. तिच्यासोबत बँकेचा को ऑनर आणि बोर्ड चेअर रोमान्यतादेखील सामील होता. या प्रकरणात आधी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. घटनेच्या चार वर्षांनंतर इनेसा यांना सुनावणीसाठी रशियाला आणण्यात आलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bank details, Crime news, Money

    पुढील बातम्या