Home /News /videsh /

श्रीलंकेपाठोपाठ इराकमध्ये लोकांचा उठाव, संसदेचा घेतला ताबा, नेत्यांच्या घरात घुसले

श्रीलंकेपाठोपाठ इराकमध्ये लोकांचा उठाव, संसदेचा घेतला ताबा, नेत्यांच्या घरात घुसले

 श्रीलंकेमध्ये नागरिकांनी सरकारविरोधी आंदोलन करताना राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतला होता. अशीच परिस्थिती सध्या इराकमध्ये झाली आहे.

श्रीलंकेमध्ये नागरिकांनी सरकारविरोधी आंदोलन करताना राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतला होता. अशीच परिस्थिती सध्या इराकमध्ये झाली आहे.

श्रीलंकेमध्ये नागरिकांनी सरकारविरोधी आंदोलन करताना राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतला होता. अशीच परिस्थिती सध्या इराकमध्ये झाली आहे.

    इराक, 28 जुलै : श्रीलंकेमध्ये नागरिकांनी सरकारविरोधी आंदोलन करताना राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतला होता. अशीच परिस्थिती सध्या इराकमध्ये झाली आहे. या ठिकाणी पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला विरोध करण्यासाठी लोक आंदोलन (Iraq protest) करत आहेत. या आंदोलनामध्ये नागरिकांनी राजधानी बगदादमधील संसद भवन आपल्या ताब्यात (Iraq parliament captured) घेतलं आहे. या वेळी शेकडो लोक संसदेत इराकचा राष्ट्रध्वज फडकवताना, आणि टेबल-खुर्च्यांवर चढून घोषणाबाजी करताना दिसून आले. मोहम्मद शिया अल-सुदानींना विरोध मिळालेल्या माहितीनुसार, हे आंदोलन पंतप्रधानपदासाठी मोहम्मद शिया अल-सुदानी यांच्या उमेदवारी विरोधात (Iraq PM candidate) आहे. अल-सुदानी (Mohammad Shia Al Sudani) हे माजी मंत्री आहेत, तसंच माजी प्रांतीय गव्हर्नर म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. अल-सुदानी हे इराणचा पाठिंबा असलेल्या पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांना विरोध केला जातोय. या आंदोलनकर्त्यांपैकी बहुतांश लोक हे इराकमधील शिया नेते मुक्तदा अल-सदर (Muqtada Al Sadar) यांचे समर्थक असल्याचं म्हटलं जात आहे, अल-जझिरा या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पंतप्रधानपदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध इराकमध्ये 2021 साली ऑक्टोबरमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मौलवी अल-सदर यांच्या गटाने 73 जागांवर विजय मिळवला होता. 329 सदस्यसंख्या असलेल्या संसदेत बहुमत मिळवणारा हा गट ठरला आहे. मात्र, इराकचे राष्ट्रपती बनण्यासाठी आवश्यक असणारे बहुमत न मिळाल्यामुळे मुक्तदा अल-सदर यांनी सरकार स्थापन करण्याच्या चर्चेतून माघार घेतली होती. यानंतर आता पंतप्रधानपदासाठी पुन्हा नवीन चेहऱ्याचा शोध सुरू आहे. मात्र, यात अल-सुदानी यांच्या उमेदवारीला विरोध होतो आहे. ग्रीन झोन घेतला ताब्यात आंदोलकांनी बुधवारी (27 जुलै 22) राजधानीतील उच्च सुरक्षा असलेला ग्रीन झोन, सरकारी भवन, परिसरातील राजकीय निवासस्थानं यांचा ताबा (Iraq Green zone captured by protestors) घेतला. यानंतर ते थेट संसदेमध्ये शिरले. स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या वेळी संसद भवनात केवळ सुरक्षा रक्षक उपस्थित होते. त्यांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला नाही, आणि सहजच आत जाऊ दिले. आंदोलकांचे काही व्हिडिओ (Iraq protest videos) समोर आले आहेत, यामध्ये शेकडो लोक संसदेत इराकचा ध्वज फडकवताना दिसत आहेत. तसंच, कित्येक लोक टेबल-खुर्च्यांवर चढलेले दिसत आहेत. या वेळी काही आंदोलकांच्या हातात मुक्तदा अल-सदर यांचे फोटोदेखील होते. हे आंदोलक “अल-सुदानी, आऊट!” अशा घोषणा देत होते. पोलिसांचे प्रयत्न निष्फळ, पंतप्रधानांचा इशारा ग्रीन झोनच्या मुख्य प्रवेशद्वारांवर पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी वॉटर कॅननचाही वापर केला. तसंच, पोलिसांनी तातडीने सिमेंटची भिंतही उभारली. मात्र, आंदोलकांनी ही भिंत पाडून आतमध्ये प्रवेश केला. दरम्यान, कार्यकारी पंतप्रधान मुस्तफा अल कदिमी यांनी आंदोलकांना तातडीने ग्रीन झोन सोडण्यास सांगितलं आहे. जर लवकरच ही जागा रिकामी करण्यात आली नाही, तर सुरक्षा दलांना पाचारण करावं लागेल असा इशाराही पंतप्रधानांनी दिला.
    First published:

    पुढील बातम्या