मनामा, 25 ऑगस्ट: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)च्या पहिल्या आखाती दौऱ्यादरम्यान बहरीन सरकारने 250 भारतीय कैद्यांची शिक्षा माफ केली. बहरीन सरकारने सद्भावनेने भारतीय कैद्यांची शिक्षा माफ केली. बहरीन सरकारच्या या शाही माफीबद्दल पंतप्रधान मोदींनी आभार मानले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परदेशातील विविध देशात मिळून 8 हजार 189 भारतीय कैद आहेत. यात सौदी अरबमध्ये सर्वाधिक 1 हजार 811 आणि त्यानंतर UAEमध्ये 1 हजार 392 भारतीय कैदी आहेत. अर्थात बहरीनमधील तुरुंगात किती भारतीय कैदी आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण तेथील नेतृत्वाने 250 भारतीय कैद्यांची शिक्षा माफ केली आहे.
बहरीन सरकारच्या या निर्णयानंतर पंतप्रधान मोदींनी बहरीनचे शाह आणि पूर्ण शाही कुटुंबाचे यासाठी आभार मानले आहेत. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केला आहे.
In a kind and humanitarian gesture, the Government of Bahrain has pardoned 250 Indians serving sentences in Bahrain.
— PMO India (@PMOIndia) August 25, 2019
PM @narendramodi thanks the Bahrain Government for the Royal Pardon.
मोदींनी मानले आभार
The Prime Minister has specially thanked the King of Bahrain and the entire Royal Family for their kindness and compassionate decision.
— PMO India (@PMOIndia) August 25, 2019
श्री कृष्णाचे 200 वर्ष जुने मंदिर
बहरीन दौऱ्यात मोदींनी राजधानी मनामा येथे भगवान श्री कृष्णाचे 200 वर्ष जुने असेल्या मंदिराच्या पुनर्निमितीसाठी प्रकल्पाचा शुभारंभ केला. या योजनेसाठी 42 लाख डॉलर इतका खर्च येणार आहे. मनामा श्रीनाथजी (श्री कृष्ण) मंदिराच्या पुनर्निमितीचे काम या वर्षाच्या अखेरस सुरू केले जाईल. 200 वर्ष जुने असलेले हे मंदिर 45 हजार स्केअर फुट इतक्या जागेत उभारले जाणार आहे. या मंदिरासोबत 3 मजली भवनाची निर्मिती केली जाणार आहे. पंतप्रधान मोदी शनिवारी बहरीनला पोहोचले. बहरीनला भेट देणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. मोदींनी बहरीनचे वली अहमद सलमान बिन हमाद बिन इसा अल खलीफा यांची भेट घेतली. तसेच दोन्ही देशांमध्ये मैत्री वाढवण्यासाठी चर्चा देखील केली. भारत आणि बहरीनमध्ये व्यापारी आणि संस्कृतीक आदान-प्रदान करण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
VIDEO: खासदार सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर दंडात्मक कारवाई, इतर टॉप 18 बातम्या