ढाका, 27 जुलै : भारतातील अयोध्यामध्ये भगवान श्रीराममंदिर उभारण्यात येणार आहे. याबाबतील बांग्लादेशाचे परराष्ट्र मंत्री अब्दुल मोमेन यांनी टिप्पणी करीत रविवारी म्हटले की भारताला असं पाऊल उचलण्यापासून वाचायला हवं. यातून त्यांच्या शेजारील देशांसह ऐतिहासिक गठबंधनाला धक्का पोहोचणार नाही.
अयोध्यात श्रीराममंदिरांचा शिलान्यास 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. याबाबतील बांग्लादेशाच्या राजनैतिक विश्लेषकांचे म्हणणे आहे की – बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीनाच्या विरोधकांना ही एक राजकीय संधी मिळेल.
हे वाचा-हिंदूस्तानात आणल्याबद्दल निदान सिंह यांनी मानले आभार; तालिबानींनी केलं होत अपहरण
दोन्ही देश नातेसंबंध खराब करु इच्छित नाही
बांग्लादेशचे परराष्ट्र मंत्री मोमेन यांनी मंदिरावर इशारा करीत म्हणाले – दोन्ही देश आपले नातेसंबंध खराब करू इच्छित नाही. त्यामुळे भारताने असे कोणतेही बदल करु नये ज्यामुळे दोन्ही देशांतील संबंध खराब होतील.
हे वाचा-कोरोनानंतर अमेरिकेत आणखी एक संकंट, तब्बल 640 लोकांना झाली विचित्र आजाराची लागण
द हिंदू वृत्तपत्रात मोमेन यांच्या हवाल्याने लिहिले आहे की – आम्ही यामुळे एकमेकांमधील संबंध बिघडू देणार नाही. मात्र दोन्ही देशांनीही एकमेकांचे संबंध खराब होणार नाही याची काळजी घेऊन बदल करावयास हवे. गेल्या आठवड्यात बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र बांग्लादेशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बातचीतच्या वृत्ताबाबत नकार दिला. येत्या 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत राममंदिरासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे मोठ मोठे नेते उपस्थित लावणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या देशात कोरोनाचं संकट असताना अशा प्रकारच्या उत्सव साजरा करण्याबाबत विरोधकांनी निशाणा साधला जात आहे.