धक्कादायक; #MeTooनंतर महिलांना नोकऱ्या देत नाहीत पुरुष!

धक्कादायक; #MeTooनंतर महिलांना नोकऱ्या देत नाहीत पुरुष!

#MeToo मुळे अनेक धक्कादायक गोष्टी जगासमोर आल्या हे खर असलं तर आता त्याही पेक्षा एक खळबळजनक बाब आता समोर आली आहे.

  • Share this:

टेक्सास, 16 सप्टेंबर:  पाश्चिमात्य देशात 2017मध्ये #MeToo या कॅम्पेनला सुरुवात झाली. महिलांवर झालेल्या अत्याचाराबाबत वाचा फोडणाऱ्या या मोहीमेची प्रचंड चर्चा झाली होती. पाश्चिमात्य देशांतील ही मोहीम भारतात 2018मध्ये दिसली. #MeToo हा हॅशटॅग वापरून जगभरातील अनेक महिलांनी त्यांच्यासोबत झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. #MeToo मुळे अनेक धक्कादायक गोष्टी जगासमोर आल्या हे खर असलं तर आता त्याही पेक्षा एक खळबळजनक बाब आता समोर आली आहे. अमेरिकेतील ह्यूस्टन विद्यापीठाने केलेल्या एका सर्व्हेत पुरुष आता आकर्षक आणि सुंदर महिलांना नोकरी देण्याआधी विचार करतात असे म्हटले आहे.

ह्यूस्टन विद्यापीठातील प्राध्यापक लीन एटव्हाटर यांनी केलल्या सर्व्हेमधून ही माहिती समोर आली आहे. #MeTooच्या मोहीमेनंतर 19 टक्के पुरुषांनी सांगितले की ते आकर्षक महिलांना नोकरी देण्यास तयार नाहीत. तर 21 टक्के पुरुषांनी सांगितले की, ते अशा पदावर महिलांना नोकरी देण्यास तयार नाही जेथे थेट पुरुषांशी संबंध असतो. इतक नव्हे तर या सर्व्हेनुसार 27 टक्के पुरुषांनी असे देखील सांगितले की, ते आता महिलांसोबत मीटिंग देखील करण्यास तयार नाहीत.

पुरुष जास्त जागरूक

#MeToo मोहीमेनंतर महिलांच्या तुलनेत पुरुष लैंगिक शोषणाबाबत अधिक जागरुक झाले आहेत. 74 टक्के महिला त्यांच्यावर झालेल्या अनुचित प्रकारबाबत तक्रार करतात. तर 77 टक्के पुरुषांना याची माहिती आहे की महिलांवर शोषणाचे प्रकार काय आहेत. अर्थात महिलांना नोकरीवर न घेतल्यामुळे कार्यालयातील जेंडर गॅपवर परिणाम होऊ शकतो.

बेशिस्तपणाच्या आरोपावर उदयनराजेंचं कॉलर स्टाईल उत्तर, पाहा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: September 16, 2019, 5:07 PM IST
Tags: Me Too

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading