मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

लॉकडाऊन हटवल्यानंतर पुन्हा पसरला कोरोना, चीनमध्ये प्रत्येक तासाला कोरोनाचे 3 नवीन रुग्ण

लॉकडाऊन हटवल्यानंतर पुन्हा पसरला कोरोना, चीनमध्ये प्रत्येक तासाला कोरोनाचे 3 नवीन रुग्ण

डॉक्टर कॅमरन वॅब यांनी या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, डास चावल्यानं कोरोना व्हायरस पसरत नाही. हा एक रेस्पिरेटरी व्हायरस आहे. जो शिंका आल्यानं किंवा खोकल्यामार्फत परसतो.

डॉक्टर कॅमरन वॅब यांनी या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, डास चावल्यानं कोरोना व्हायरस पसरत नाही. हा एक रेस्पिरेटरी व्हायरस आहे. जो शिंका आल्यानं किंवा खोकल्यामार्फत परसतो.

चीनमध्ये लॉकडाऊन हटवल्यानंतर लोकांचे जीवन पुन्हा रुळावर येत आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे चीनमध्ये कोरोना पुन्हा पाय पसरू लागला आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
वुहान, 14 एप्रिल : कोरोनाव्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. अशा परिस्थितीत बहुतेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. असे असताना चीनमध्ये मात्र हळूहळू निर्बंध हटविले जात आहेत. एकीकडे चीनमध्ये लॉकडाऊन हटवल्यानंतर लोकांचे जीवन पुन्हा रुळावर येत आहे. तर दुसरीकडे धक्कादायक बाब म्हणजे चीनमध्ये कोरोना पुन्हा पाय पसरू लागला आहे. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोना नवीन रुग्ण आढळून आले आहेत. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या म्हणण्यानुसार, रविवारी येथे 108 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर शनिवारी 99 आणि शुक्रवारी 46 नवीन रुग्णांची नोंद झाली. म्हणजे 3 दिवसांत चीनमध्ये 253 नवीन रुग्ण आढळून आले. यातील 10 रुग्ण हे परदेशातून पुन्हा मायदेशी परतलेले आहे. वाचा-भारतात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 10 हजारावर, हे आहे संपूर्ण देशाचे अपडेट तर, 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे हेलोंगजियांगमधून आलेले आहेत, जे रशियाच्या सीमेलगत आहे. याआधी चीन-रशिया सीमा बंद करण्यात आली होती. मात्र लॉकडाऊन हटवल्यानंतर तेथे अडकलेल्या लोकांना पुन्हा मायदेशी आणण्यात आले. चीनच्या शांघाय येथे रशियातून आलेल्या विमानातील 51 चिनी नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. अशा 21 कोरोना रूग्णांची खात्री झाली आहे की हेलोंगजियांग प्रांतातील आहेत. वाचा-CoronaVirus नेमका आहे तरी कसा? 5 महिन्यात उलगडलेली विषाणूची रहस्यं वुहानमध्ये हटवले निर्बंध वुहानमधील अधिकाऱ्यांनी यापूर्वीच निर्बंध रद्द केले आहेत, परंतु हार्बिन तसेच सीमा शहर सुफिनामध्ये वुहानप्रमाणे लॉकडाऊन केले गेले आहे. फेब्रुवारीमध्ये रशियाने चीनकडे जाण्यासाठी सर्व उड्डाणे थांबविल्यामुळे, लोकांसाठी चीनकडे परत जाण्यासाठी सूफिन हा एक प्रमुख मार्ग बनला. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हेलॉंगजियांगची राजधानी असलेल्या सुईफ आणि हार्बिन या सीमावर्ती शहरातील परदेशी लोकांना 28 दिवसांसाठी क्वारंटानइन ठेवण्यात आले होते. वाचा-कोरोनाचा कहर! अमेरिकेत 22000 जणांचा मृत्यू, बाधितांची संख्या 5 लाखांहून अधिक कोरोना रिसर्चमध्ये चीन अव्वल कोरोना व्हायरस रोखण्यासाठी जगभरात जितके रिसर्च आणि क्लिनिकल शोध सुरू आहेत, त्यामध्ये सर्वाधिक 60 शोध आणि प्रयोग करीत चीन सर्वात पुढे आहे. ब्रिटेनच्या एका कंपनीने आपल्या सर्वेक्षणात दिल्यानुसार यावेळी जगात 39 देशांपैकी कोरोनाची लसीचा शोध घेण्यात आणि यासंदर्भात सुरू असलेल्या संशोधनाची संख्या तब्बल 300 इतकी आहे. त्यात चीनमधील शोधसंख्या 60 इतकी आहे. तर अमेरिकेने 49 शोध व अभ्यास केल्याचे समोर आले आहे. संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या