मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

कोरोनाचा कहर! मृतांची संख्या वाढली, आतापर्यंत 7 हजार लोकांचा घेतला जीव

कोरोनाचा कहर! मृतांची संख्या वाढली, आतापर्यंत 7 हजार लोकांचा घेतला जीव

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

इटलीमध्ये थैमान घातल्यानंतर या विषाणूने आणखी एका देशात आपली दहशत पसरवली आहे.

    पॅरिस, 17 मार्च : कोरोनाव्हायरस (CoronaVirus) जगातील सर्व देशांसाठी सर्वात मोठा धोका ठरत आहे. युरोपात हा विषाणू वाऱ्यासारखा पसरत आहे. इटलीमध्ये थैमान घातल्यानंतर या विषाणूने आणखी एका देशात आपली दहशत पसरवली आहे. इटली, इराणनंतर आता फ्रान्समधील स्थिती भयावह झाली आहे. त्यामुळे जगभरात आता मृतांची संख्या सात हजारांवर पोहचली आहे. फ्रान्समध्ये वेगाने कोरोना पसरत असल्यामुळे सध्या जागत 1 लाख 75 हजार 536 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांची संख्ये 7 हजारहून अधिक झाली आहे. यात चीनमधील 3213 तर इटलीमधील 2158 लोकांचा समावेश आहे. वाचा-पुण्यात आजपासून पुढचे 3 दिवस व्यापार बंद, या महत्त्वाच्या ठिकाणांवरही बंदी फ्रान्समध्ये वेगाने पसरतोय कोरोना फ्रान्सचे आरोग्या प्रमुख जेरोम सालोमन यांनी, कोरोनाला महामारी म्हणून घोषित केले आहे. यामुळे परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. त्यांच्या मते, देशात गंभीर आजारी रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाचा-कोरोनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी होम क्वारंटाइन; जाणून घ्या काय करावं, काय नाही 5423 प्रकरणे समोर आली आहेत फ्रान्सच्या अधिकृत आकडेवारीनुसार कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या आतापर्यंत 5,423 वर पोहोचली आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 127 लोकांचा मृत्यू झाला आहे. वाचा-पाकिस्तानमध्ये कोरोनाचं थैमान, 24 तासांमध्ये भारतापेक्षाही जास्त रुग्ण आढळले 24 तासात 900 लोकांना लागण फ्रान्समध्ये गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 36 झाली आहे. 24 तासात 900 नवीन संसर्गित रुग्ण समोर आले आहेत. या व्यतिरिक्त 400 पेक्षा जास्त गंभीर रूग्णांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचा-मंत्री, खेळाडू, कलाकारांनाही ‘कोरोना’; ‘या’ नामांकित व्यक्तींना व्हायरसची लागण काय सांगतात आकडे कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढला आहे. लोकांना याची भीती वाटत असली तरी याबाबत .एक सकारात्मक बातमीही समोर आली आहे. कोरोनाविषयी नवीनतम माहिती देणारी वेबसाइट वर्ल्डोमीटर डॉट कॉम या वेबसाइटनुसार आतापर्यंत या आजाराची एकूण 160,564 घटना समोर आल्या आहेत. 5,962 लोकांचा यात मृत्यू झाला आहे. परंतु या आजाराशी लढा देऊन निरोगी झालेल्या लोकांची टक्केवारीही कमी नाही. जगातील 75 हजार 959 लोक या कोरोनाला हरवत निरोगी झाले आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या