इटली नंतर आता स्पेनमध्ये कोरोनाचा धुमाकूळ, एकाच दिवसात 394 जणांचा मृत्यू

इटली नंतर आता स्पेनमध्ये कोरोनाचा धुमाकूळ, एकाच दिवसात 394 जणांचा मृत्यू

  • Share this:

माद्रिद 23 मार्च : इटली नंतर युरोपातल्या स्पेनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस मृत्यूचा आकडा वाढत असून आज एकाच दिवसात 394 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 170 झाली आहे. येत्या काळात आणखी वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागेल असं स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सॅँचेज यांनी म्हटलं आहे. सरकार देशातल्या हॉस्पिटल्समध्ये साधनांची कमतरता पडू देणार नाही असंही त्यांनी म्हटल्याचं वृत्त ‘बीबीसी’ने दिलं आहे.

राजधानी माद्रिदमध्ये कोरोनाचा सर्वात जास्त कहर आहे. देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली असून लोकांनी घराबाहेर पडू नये असे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे सर्व देशच लॉकडाऊन झाला आहे.

दरम्यान, महाभयंकर कोरोना व्हायरसची सगळ्यात पहिल्यांदा माहिती वुहानच्या डॉ. ली वेनलियांग यांनी दिली होती. नंतर कोरोनामुळेच त्यांचा मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी डॉ. ली यांना अफवा पसरविण्याच्या आरोपांखाली कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे ली यांची माहिती बाहेरच आली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला.

VIDEO 'हे तरी ऐका ...' इटलीत राहणाऱ्या अभिषेक डेरले यांचे अनुभव डोळे उघडतील

कोरोनाने जेव्हा सगळ्या चीनला व्यापून टाकलं त्यावेळी ली यांच्या विषयीची माहिती बाहेर आली होती. व्हिसलब्लोअर ठरलेल्या ली यांना सर्व जगाने श्रद्धांजली वाहिली. आता सर्व जग कोरोनाने व्यापलं असताना चीन सरकारने ली यांच्या कुटुंबीयांची माफी मागितल्याचं वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलं आहे.

'... तर 48 तासात दहा हजार लोक मरतील', न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी दिला इशारा

चीनच्या सत्ताधारी कम्युनिष्ट पक्षाच्या शिस्तपालन समितीने त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे. ली यांनी जी माहिती दिली होती त्याचं गांभीर्य आम्हाला कळालं नाही असं या समितीने म्हटलं आहे. तर ज्या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना धमी दिली होती त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही चीनच्या सरकारने दिले आहेत.

 

First published: March 23, 2020, 7:20 PM IST

ताज्या बातम्या