भारतानंतर अमेरिकाही आणणार टिकटॉकसह चिनी अॅप्सवर बंदी? परराष्ट्रमंत्र्यांचा खुलासा

भारतानंतर अमेरिकाही आणणार टिकटॉकसह चिनी अॅप्सवर बंदी? परराष्ट्रमंत्र्यांचा खुलासा

भारताने टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी आणली आहे. त्यानंतर अनेक देश याबाबत विचार करीत आहेत

  • Share this:

वॉशिंग्टन, 7 जुलै : भारताने काही दिवसांपूर्वी चिनी अॅप टिकटॉकसह 59 अॅप्सवर बंदी घालण्याचे जाहीर केले आहे.  त्यानंतर अमेरिकेतही चिनी अॅप टिकटॉकसह इतर अॅप्सवर बंदी घालण्याचा विचार सुरू असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ म्हणाले की, अमेरिका चीनच्या सोशल मीडिया अॅप्सवर (टिकटॉकसह) बंदी घालण्याचा विचार करीत आहे. काही दिवसांपूर्वीच या लोकप्रिय व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर भारताने बंदी घातली आहे.

29 जून रोजी भारताने 59 अॅप्सवर बंदी घातली

29 जून रोजी भारताने चीनशी संबंधित अॅप्सवर बंदी घातली. यातील  टिकटॉक आणि यूसी ब्राउझर यामुळे देशाच्या सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षेला धोका आहे. सोमवारी फॉक्स न्यूजच्या लॉरा इनग्रामशी मुलाखतीत पोम्पिओ म्हणाले की, ते आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ही बातमी अत्यंत गंभीरपणे घेत आहेत, जेव्हा मुलाखतकर्त्याने त्यांना सांगितले की, भारताने अॅपवर बंदी आणली असून ऑस्ट्रेलियाही यावर विचार करीत आहे. तेव्हा ते म्हणाले की, आम्ही हे अत्यंत गांभीर्याने घेत आहोत आणि नक्कीच यावर विचार करत आहोत.

हे वाचा-धक्कादायक प्रकार, मुंबईतील मुलीचं केलं अपहरण; राजस्थानमध्ये नेऊन केला बलात्कार

ते म्हणाले की आम्ही जेडटीईला अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे घोषित केले आहे. पॉम्पिओ म्हणाले की, लोकांच्या फोनमध्ये चिनी अॅप्स आहेत, तेथे मी तुम्हाला खात्री देतो की अमेरिकाही या समस्येचे निराकरण करेल. ते पुढे म्हणाले की, या प्रकरणाचा तपशीलवार तपास सुरू असून स्वत: राष्ट्रपतींच्या घोषणेपूर्वी काहीही सांगू शकत नाही.

त्यांनी अमेरिकन लोकांना असा इशारा दिला की जर त्यांना आपली वैयक्तिक माहिती "कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइना" कडे सोपवायची नसेल तर त्यांनी टिकटॉकच्या वापराबाबत खबरदारी घ्यावी.

Published by: Meenal Gangurde
First published: July 7, 2020, 7:26 PM IST

ताज्या बातम्या