मॉस्को 30 ऑक्टोबर: फ्रान्स (France Church Attack) आणि सौदी अरेबियानंतर रशिया(Russia) सुद्धा एका हल्ल्याने हादरुन गेला आहे. एका तरुणाने 'अल्लाहू अकबर' (Allahu Akbar)अशा घोषणा देत एका पोलिसावर चाकू हल्ला केला. या तरुणाने पोलिसाच्या पाठीवर सपासप तीन वेळी वार केले. यात पोलीस जखमी झाला. हा दहशतवादी हल्लाच असल्याचं रशियाने म्हटलं आहे. या आधी सौदी अरेबियातही फ्रान्सच्या उच्चायुक्तालयाबाहेर गार्डवर चाकू हल्ला करण्यात आला होता.
फ्रान्सच्या नीस शहरात एका ट्युनेशियन नागरिकाने चर्चमध्ये हल्ला करत तीन जणांची हत्या केली होती. त्यानंतर जगभर त्याचे पडसाद उमटले होते.
रशियाच्या Interfax या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर तरुण हा चाकू आणि पेट्रोल बॉम्बघेऊनच वावरत होता. रशियातल्या कुक्मोर या शहरातली ही घटना आहे. हा मुस्लिम बहुल भाग असून या भागात फ्रान्स विरुद्ध निदर्शनेही झाले होते.
तरुण हा पोलिसांवर पाळत ठेवून होता. त्याने पाठीमागून येत त्या पोलिसावर वार केलेत. त्यात तो जखमी झाला. त्याच वेळी त्याच्या सोबत असलेल्या दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने हल्लेखोर तरुणावर गोळ्या झाडल्या. त्यात हा तरुण ठार झाला. हल्ला करण्याच्या आधी त्याने 'अल्लाहू अकबर'अश्या घोषणा दिल्या आणि पोलिसांना काफीर असं म्हटल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
अमेरिकन सिनेटरना घेता येईना Google च्या CEO चं नाव; पिचाई चा उच्चार काय केला...
फ्रान्स मधल्या घटनेनंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. अनेक मुस्लिम देशांनी फ्रान्स सरकारच्या भूमिकेचा विरोध केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशात कट्टरतावादाला स्थान नाही अशा प्रवृत्तीविरोधात लढण्यासाठी तयार असल्याचं फ्रान्सने म्हटलं आहे.
कोरोनाच्या संकटाशी झुंजत असतानाच फ्रान्सला आता या नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. जगभरातून फ्रान्समधल्या हल्ल्याचा तीव्र निषेध होत आहे.
Boy, 16, screaming 'Allahu Akbar' is shot dead by cops after knife attack on police officer in Muslim-majority Russian regionhttps://t.co/HraNdjG4mn pic.twitter.com/FpCnIo78I2
— Daily Mail Online (@MailOnline) October 30, 2020
फ्रान्समधला हल्लेखोर ट्यूनीशियाचा हा तरुण इटलीमार्गानं फ्रान्समध्ये आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास करताना दहशतवादीविरोधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा माणूस भूमध्य सागरी भागातल्या लम्पेडुसा या बेटावरुन 20 सप्टेंबरला इटलीला आला होता. त्यानंतर ते 9 ऑक्टोबर रोजी इटलीहून पॅरिसला पोहोचले.
Fact Check: पाकिस्तानच्या संसदेत मोदी मोदीचे नारे? व्हायरल VIDEOने खळबळ
त्याच्या फ्रान्सला पोहोचल्याची माहिती इटालियन रेडक्रॉसच्या एका व्यक्तीच्या कागदपत्रातून समोर आली आहे. ट्युनिशियाच्या य़ा नागरिकानं हातात कुराण पकडून चर्चवर हल्ला केला. पोलिसांच्या कारवाईत हा हल्लेखोर जखमा झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.