Home /News /videsh /

एका झटक्यात सगळं जिंकलं; आता सरकार स्थापन करणार तालिबान, समोर आहेत ही मोठी आव्हानं

एका झटक्यात सगळं जिंकलं; आता सरकार स्थापन करणार तालिबान, समोर आहेत ही मोठी आव्हानं

आता तालिबान अफगाणिस्तानात सरकार स्थापन (Taliban to Form Government in Afghanistan) करण्याच्या तयारीत आहे. मात्र तालिबानपुढे सर्वात मोठी समस्या म्हणजे अर्थव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली आहे.

    काबूल 03 सप्टेंबर : अफगाणिस्तानमध्ये तालिबानला (Taliban Regains Control of Afghanistan) इतक्या लवकर सत्ता मिळाली की, याचा खुद्द दहशतवादी संघटनेच्या सर्वोच्च कमांडरांनीही विचार केला नव्हता. तालिबानी कमांडर मावलावी हबीब तवाकोईच्या म्हणण्यानुसार 15 ऑगस्ट रोजी ते काबूलच्या बाह्य सीमेवर आले होते. त्यांना वाटलं, की काबूलमध्ये (Kabul) प्रवेश करण्यासाठी बरेच आठवडे लागू शकतात. पण अशरफ घनी आणि त्यांचे साथी देश सोडून पळून गेले. मावलावीला वरच्या नेतृत्वाकडून शहरात प्रवेश करण्याचा आदेश मिळाला (Afghanistan Crisis). तालिबानकडून पाकिस्तानला मोठा झटका, काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करण्यास नकार काही तासांतच तालिबानाचे दहशतवादी काबूलच्या रस्त्यांवर दिसू लागले. हे सर्व खूप लवकर घडलं. पण त्यानंतरचा रस्ता सर्वात कठीण होता. कारण काबूलच्या सत्तेवर कब्जा केल्यानंतर तालिबान्यांसमोर सत्ता चालवण्याचे आणि त्यांची चांगली प्रतिमा दाखवण्याचं आव्हान होतं. एकीकडे, संघटनेचे सर्वोच्च नेते जगासमोर आपली चांगली प्रतिमा मांडत राहिले आणि महिलांबाबत काही उदारमतवादी निर्णय घेण्याची घोषणा केली. कर्जमाफीची घोषणा केली. पण काबुलच्या पलीकडे असलेल्या छोट्या शहरांमध्ये आणि भागात तालिबानच्या दहशतवाद्यांची क्रूरता कायम राहिली. गिलानींना श्रद्धांजली वाहताना इम्रान खान यांचं वादग्रस्त ट्विट, ओकली गरळ आता तालिबान अफगाणिस्तानात सरकार स्थापन (Taliban to Form Government in Afghanistan) करण्याच्या तयारीत आहे. मात्र तालिबानपुढे सर्वात मोठी समस्या म्हणजे अर्थव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली आहे. सेंट्रल बँक बंद झाल्यामुळे आणि परदेशी मदत पूर्णपणे बंद झाल्यामुळे रोख रकमेची समस्या आहे. तालिबान ज्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत आहे, त्यापैकी बहुतेक सरकारी कर्मचारी भयंकर घाबरले आहेत. त्यामुळे मोठी आर्थिक समस्या सध्या तालिबानसमोर आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Afghanistan, Taliban

    पुढील बातम्या