न्यूझीलंडमधील दहशतवादी हल्ल्यानंतर 9 भारतीय बेपत्ता

न्यूझीलंडमधील दहशतवादी हल्ल्यानंतर 9 भारतीय बेपत्ता

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर 9 भारतीय बेपत्ता आहेत.

  • Share this:

ख्राईस्टचर्च, 15 मार्च : न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमध्ये 2 मशिदीवर अंदाधुंद गोळीबार झाला. त्यानंतर आता 9 भारतीय बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. या गोळीबारात 49 जणांना मृत्यू झाला. यानंतर 9 भारतीय बेपत्ता झाल्याची माहिती भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. ब्रेंटन टैरंट ( 28 ) असं या हल्लेखोराचं नाव आहे.

'पाकचा क्रिकेटपट्टू झाला पंतप्रधान; आमच्याकडे PM बनण्याचे स्वप्न पाहणारा क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष'

गोळीबार करण्यापूर्वी ब्रेंटन टैरंटनं फेसबुकवर लाईव्ह स्ट्रिमिंग केलं होतं. यामध्ये तो चला आता पार्टी करू असं म्हणताना दिसत आहे. गुरूवारी टैरंटनं फेसबुकवरून आपली इच्छा व्यक्त केली होती. पोस्टमध्ये त्यानं हल्ल्याबाबत लिहिलं होतं. यामध्ये आत्तापर्यंत चौघांना अटक करण्यात आलं असून त्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.

बांगलादेश-न्यूझीलंड सामना रद्द

दरम्यान, बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा तिसरा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. 16 मार्चला ओव्हलवर तिसरी कसोटी खेळवण्यात येणार होती. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. बांगलादेश आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मिळून हा निर्णय घेतला आहे.

गोळीबार होत असल्याचे समजताच अल नूर मशिदीतून बांगलादेशचे क्रिकेटपटू सुरक्षितपणे बाहेर पडले. तिथून सर्व खेळाडू हॉटेलवर पोहचले.

EXCLUSIVE VIDEO : 6 जणांच्या मृत्यूला कारणीभूत पूल अखेर कायमचा हटवला

First published: March 15, 2019, 9:59 PM IST
Tags: newzealand

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading