Coronavirus नंतर आता या नव्या विषाणूचा धोका, ब्राझीलमध्ये सापडला नवा व्हायरस

Coronavirus नंतर आता या नव्या विषाणूचा धोका, ब्राझीलमध्ये सापडला नवा व्हायरस

कोरोनाव्हायरसनंतर आता ब्राझीलमध्ये नवा व्हायरस सापडला आहे. ब्राझीलमधील 2 वैज्ञानिकांनी हा व्हायरस निदर्शनास आणून दिला आहे.

  • Share this:

ब्राझील, 14 फेब्रुवारी : देशभरात coronavirus ने हाहाकार माजवला आहे. चीनमधील वुहान शहर पुर्णपणे coronavirusच्या विळख्यात आहे. तर इतर अनेक देशांमध्येही आता कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संपुर्ण देशाला कोरोनाचा धोका आहे. चीनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत 1,113 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर आणखी 2,015 नवीन प्रकरणं समोर आलीत आहेत. त्यामुळे कोरोनाव्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. चीनमधील वुहान शहरात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अनेक हॉस्पिटलही तयार करण्यात आली आहेत. तर चीनमधील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. चीनशहर शटडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाव्हायरसवर मात करण्यासाठी अनेक वैज्ञानिकांचं संशोधन सुरू आहे.

त्यातच आता कोरोनाप्रमाणेच नवा व्हायरस समोर आला आहे. ब्राझीलमध्ये yaravirus सापडला आहे. कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता या yaravirus मुळे खळबळ उडाली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, ब्राझीलच्या वैज्ञानिकांनी या yaravirus निदर्शनास आणून दिला आहे. ब्राझीलच्या 2 शास्त्रज्ञांनी त्यांचा रिसर्च पेपर सादर करताना हा नवा व्हायरस निदर्शनास आणून दिला आहे. या व्हायरसमध्ये प्रोटीनच एकीकरण करण्याची क्षमता आहे.

मुलगी नोकरी करणारीच हवी; लग्न करताना मुलाची का असते अशी अट?

रिसर्च पेपरनुसार, या व्हायसला अमिओबल व्हायरस (Ameobal viruses) च्या कोणत्याच प्रकारात मोडता येणार नाही. संशोधनात समोर आलेल्या माहितीनुसार, या व्हायरस इतर व्हायरसच्या तुलनेत अधिक मोठा आहे. या व्हायरसच्या पार्टिकलचा आकार हा 80-nm इतका आहे. हा व्हायरस ब्राझीलमधल्या पंपुल्हा येथिल एका कृत्रिम तलावात मिळाला होता.

आता जरी या व्हायरसमुळे कोणताही आजार झाल्याचं समोर आलेलं नसलं तरी भविष्यात या व्हायरसच्या शोधामुळे देशभरात व्हायरसविषयी सुरु असलेल्या संशोधनाला मदत मिळणार आहे.

चीनवर कोरोनाव्हायरसचा धोका अजूनही कायम आहे. त्यातच आता ब्राझीलमध्ये सापडलेल्या नव्या व्हायरसमुळे वैज्ञानिकांनीही भुवया उंचावल्या आहेत.

 

First published: February 14, 2020, 8:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading