• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • सावध व्हा! आता जगभरात पसरतोय Monkeypox चा संसर्ग, होऊ शकतो Corona सारखा कहर

सावध व्हा! आता जगभरात पसरतोय Monkeypox चा संसर्ग, होऊ शकतो Corona सारखा कहर

कोरोनापासून काही प्रमाणात सुटका झाल्याची आशा असताना अचानक मंकीपॉक्सचा (Monkeypox Infection) संसर्ग झाला आहे.

 • Share this:
  न्यूयॉर्क, 18 नोव्हेंबर: कोरोनासारखी (Corona Virus) महामारी पसरेल असे जगात कोणी विचारही केला नव्हता. या व्हायरसमुळे कोट्यवधी लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालं. एकामागून एक पसरत हा व्हायरस देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. या व्हायरसमुळे अशी परिस्थिती उद्भवली की, व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करावा लागला. अनेक देशांमध्ये लाखोंचे मृत्यू झाल्यानंतर आता त्याची लस समोर आली आहे. आता कोरोनापासून काही प्रमाणात सुटका झाल्याची आशा असताना अचानक मंकीपॉक्सचा (Monkeypox Infection) संसर्ग झाला आहे. अलीकडेच, अमेरिकेच्या राज्यात मंकी व्हायरसच्या (Confirm Case Of Monkeypox) प्रकरणाची पुष्टी झाली आहे. हा व्हायरस आफ्रिकेतून येथे आला आहे. नायजेरियातून आलेल्या एका अमेरिकनमध्ये या व्हायरसच्या संसर्गाची पुष्टी झाल्याचं सांगण्यात येत आहे. आता या प्रकरणानंतर मंकी व्हायरस पसरण्याचा धोका वाढला आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज प्रिव्हेंशन आणि मेरीलँड डिपार्टमेंट ऑफ हेल्थ यांनी एकत्रितपणे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रुग्णामध्ये मंकीव्हायरसची सौम्य लक्षणे दिसली आहेत. हेही वाचा- Laptop स्लो झालाय? वापरा 'या' 5 सोप्या Tips रुग्णाला रुग्णालयाऐवजी घरीच आयसोलेट करण्यात आले आहे. अधिकार्‍यांनी अद्याप सर्वसामान्यांसाठी कोणताही इशारा जारी केलेला नाही. प्रकरण नियंत्रणात असल्याचे सार्वजनिक आरोग्य उपसचिव डॉ जिनलेने यांनी सांगितलं आहे. मात्र सर्व खबरदारी घेतली जात आहे. तसेच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवले जात आहे. जेणेकरून हा संसर्ग इतरत्र कुठेही पसरलेला नाही हे कळू शकेल. monkey virus मंकीपॉक्स हा स्मॉलपॉक्सचा एक प्रकार आहे. फक्त त्याची लक्षणे सौम्य असतात. यामध्येही शरीरातील स्मॉलपॉक्स सारखे पुरळ बाहेर येतात. पण यामध्ये ताप फारसा नसतो. तसंच हा व्हायरस एकापासून दुसऱ्यामध्ये खूप वेगानं पसरतो. ते त्वचेपासून त्वचेवर पसरते. याशिवाय ते कपड्यांपर्यंतही पसरते. त्यामुळे बाधित व्यक्तीच्या शरीरावर पुरळ उठते. monkey virus हेही वाचा- IND vs NZ: 2 देश, 2 अर्धशतकं आणि एकसारखा स्कोअर! न्यूझीलंडच्या खेळाडूचा अनोखा रेकॉर्ड हा संसर्ग दोन ते चार आठवडे असतो. पण जर एखाद्याला या संसर्गाची लागण झाली असेल तर त्याचा प्रभाव 21 दिवसांनी दिसून येतो. आत्तापर्यंत हा व्हायरस प्राण्यांकडून माणसात येत असला तरी आता हा व्हायरस माणसाकडून माणसात पसरू लागला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, 2019 मध्ये नायजेरियामध्ये हा व्हायरस पसरला होता पण त्यानंतर त्याचा वेग थांबली. आता पुन्हा एकदा त्याची प्रकरणे पाहायला मिळत आहेत.
  Published by:Pooja Vichare
  First published: