मराठी बातम्या /बातम्या /विदेश /कोरोना लसीकरणानंतर 16 वर्षाच्या मुलाला Heart attack; सरकार देणार 1.5 कोटी रुपये

कोरोना लसीकरणानंतर 16 वर्षाच्या मुलाला Heart attack; सरकार देणार 1.5 कोटी रुपये

कोरोना लस घेतल्यानंतर एका 16 वर्षांच्या मुलाला हृदयविकाराचा झटका आला. या घटनेनंतर सरकारने त्याला मोठी नुकसानभरपाई दिली आहे.

कोरोना लस घेतल्यानंतर एका 16 वर्षांच्या मुलाला हृदयविकाराचा झटका आला. या घटनेनंतर सरकारने त्याला मोठी नुकसानभरपाई दिली आहे.

कोरोना लस घेतल्यानंतर एका 16 वर्षांच्या मुलाला हृदयविकाराचा झटका आला. या घटनेनंतर सरकारने त्याला मोठी नुकसानभरपाई दिली आहे.

    सिंगापूर, 19 ऑगस्ट : कोरोना विषाणूची लागण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात लसीकरण केले (Corona Vaccination) जात आहे. सध्या उपलब्ध असणारी कोणतीही लस ही रामबाण उपाय नसून, लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते, असं सगळ्याच लस उत्पादक कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे. सिंगापूरमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. कोरोना लस घेतल्यानंतर एका 16 वर्षांच्या मुलाला चक्क हृदयविकाराचा झटका (16 year boy gets heart attack after corona vaccination) आला. या घटनेनंतर सरकारने त्याला मोठी नुकसानभरपाई दिली आहे.

    सिंगापूर सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या 16 वर्षीय मुलाने फायझर (Pfizer vaccine) लसीचा डोस घेतला होता. हा डोस घेतल्यानंतर सहा दिवसांमध्येच त्याला हार्ट अटॅक (Heart attack after Pfizer vaccination) आला. लस घेतल्यानंतर हा धक्का बसल्यामुळे या मुलाने सरकारकडे (Singapore Vaccination) नुकसानभरपाईची मागणी केली. सरकारने परिस्थितीची माहिती करुन घेत, त्याला 2 लाख 25 हजार डॉलर्स (Singapore govt to give 1.5 crore rupees) देण्याची घोषणा केली. म्हणजेच, लसीच्या या साईड इफेक्टमुळे या मुलाला आता सुमारे दीड कोटी रुपये मिळणार आहेत. सिंगापूर व्हॅक्सिन इंज्युरी फायनॅन्शिअल असिस्टंट प्रोग्राम (VIFAP) या योजनेअंतर्गत त्याला ही रक्कम मिळणार आहे.

    डेल्टा व्हेरिएंटचा वाढता धोका पाहता अमेरिकेचा मोठा निर्णय, लोकांना घ्यावा लागणार कोरोना लसीचा बूस्टर शॉट

    कशामुळे आला हार्ट अटॅक?

    वैद्यकीय तपासणीमध्ये असं दिसून आलं, की मायोकार्डिटिसच्या (Myocarditis) समस्येमुळे या मुलाला हृदयविकाराचा झटका आला होता. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळेच ही समस्या उद्भवल्याची शक्यता मेडिकल रिपोर्टमध्ये (Myocarditis due to corona vaccination) वर्तवण्यात आली आहे. यासोबतच कॅफेनचे (Caffeine) अतिसेवन, आणि अवजड वस्तू उचलल्यामुळेही (Weightlifting) हृदयावर ताण आला असेल, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. सध्या हा मुलगा रुग्णालयात असून, त्याची तब्येत सुधारत असल्याचे सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

    कोरोना लशीमुळे पक्षाघाताचा धोका? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

    मायोकार्डिटिस काय आहे?

    मायोकार्डिटिस या आजारामध्ये हृदय कमकुवत होतं. यात हार्ट अटॅक येऊन मृत्यूही होऊ शकतो. साधारणपणे एखाद्या व्हायरल इन्फेक्शनमुळे हा आजार होतो. छातीमध्ये दुखणे, श्वास भरुन येणे ही याची लक्षणे आहेत.

    हेल्थ सायन्स अथोरिटीने म्हटले आहे, की लसीकरणानंतर मायोकार्डिटिस किंवा पेरिकार्डिटिस (Pericarditis) होण्याची शक्यता असते. सिंगापूरमध्ये मात्र एक लाखांमध्ये केवळ 0.48 लोकांना ही समस्या (Myocarditis rare in Singapore) दिसून येत आहे. फार्माकोविजिलेन्स मॉनिटरिंगच्या आधारे प्राप्त झालेल्या डेटानुसार ही माहिती देण्यात आली आहे. हे टाळण्यासाठी लसीकरण झाल्यानंतर कमीत कमी एक आठवडा आराम केला पाहिजे. या दरम्यान जिम, किंवा कोणतीही स्पोर्ट्स अक्टिव्हिटी करणं टाळावं, (Avoid Gym after vaccination) असं आवाहन अथॉरिटीने केलं आहे.

    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus