मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

सावधान! कोरोनानंतर आता `या` विषाणूचं जगावर संकट; घानामध्ये दोन जणांचा मृत्यू

सावधान! कोरोनानंतर आता `या` विषाणूचं जगावर संकट; घानामध्ये दोन जणांचा मृत्यू

विशेष म्हणजे, इबोला विषाणूची पहिली केस कॉंगो (Congo) आणि सुदानमध्ये (Sudan) 1976 मध्ये समोर आली होती. पण 2014 आणि 2016 दरम्यान पश्चिम आफ्रिकेत इबोलाबाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढली होती. त्यावेळी सुमारे 28 हजार इबोलाबाधित रुग्ण आढळले होते.

विशेष म्हणजे, इबोला विषाणूची पहिली केस कॉंगो (Congo) आणि सुदानमध्ये (Sudan) 1976 मध्ये समोर आली होती. पण 2014 आणि 2016 दरम्यान पश्चिम आफ्रिकेत इबोलाबाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढली होती. त्यावेळी सुमारे 28 हजार इबोलाबाधित रुग्ण आढळले होते.

विशेष म्हणजे, इबोला विषाणूची पहिली केस कॉंगो (Congo) आणि सुदानमध्ये (Sudan) 1976 मध्ये समोर आली होती. पण 2014 आणि 2016 दरम्यान पश्चिम आफ्रिकेत इबोलाबाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढली होती. त्यावेळी सुमारे 28 हजार इबोलाबाधित रुग्ण आढळले होते.

पुढे वाचा ...
घाना, 24 जुलै : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून कोरोनानं (Corona) जगाला वेठीस धरलं आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहे. अजूनही काही देशांमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या अडीच वर्षांत कोरोनाचे अनेक व्हेरियंट (Variant) आढळून आले आहेत. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जगभरात लसीकरणावर (Vaccination) भर दिला जात आहे. एकीकडे कोरोनामुळे ही स्थिती असताना, दुसरीकडे एका नव्या विषाणूनं (Virus) लोकांचं टेन्शन वाढवलं आहे. मारबर्ग (Marburg) असं या विषाणूचं नाव आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे गेल्या दोन महिन्यांत घाना (Ghana) या आफ्रिकी देशातल्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना अलर्ट मोडवर आली आहे. हा विषाणू अत्यंत घातक आणि संसर्गजन्य असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. `न्यूजनेशन टीव्ही`ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. कोरोनानंतर आता मारबर्ग हा नवा विषाणू आढळला आहे. यामुळे जगभरात चिंतेचं वातावरण आहे. वृत्तानुसार, गेल्या दोन महिन्यांत घानामधल्या दोन जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. या दोघांचे तपासणी अहवाल नुकतेच आले आहेत. त्यात हे दोघं मारबर्ग पॉझिटिव्ह होते, असं स्पष्ट झालं आहे. यात एका रुग्णाचं वय 26 वर्ष तर दुसऱ्या रुग्णाचं वय 51 वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. प्रशासनानं या दोघांच्या संपर्कात आलेल्या लोकांना आयसोलेट (Isolate) केलं आहे. अद्यापपर्यंत या लोकांमध्ये कोणतीही लक्षणं दिसून आलेली नाहीत. मारबर्ग विषाणूच्या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओ (WHO) अलर्ट मोडवर आली आहे. ``आरोग्य प्राधिकरणाला याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जेणेकरून जर विषाणू वेगाने पसरत असेल तर त्वरित कार्यवाही करता येईल,`` असं `डब्ल्यूएचओ`नं सांगितलं आहे. ``मारबर्गबाबत तातडीने दक्षता घेण्यात आली आहे. या विषाणूचा झपाट्याने प्रसार झाल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. आम्ही आरोग्य प्राधिकरणाला मदत करत आहोत, तसंच परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत,`` असं `डब्ल्यूएचओ`नं स्पष्ट केलं आहे. इम्युनिटी वाढवण्याच्या नादात तुम्ही हळदीचे अतिसेवन करताय? होतील हे दुष्परिणाम मारबर्ग विषाणूचा पहिला रूग्ण 1967 मध्ये जर्मनीत (Germany) आढळून आला होता. त्यावेळी जर्मनीतल्या फ्रॅंकफर्ट आणि बेलग्रेडमधल्या एकूण 31 जणांना या विषाणूचा संसर्ग झाला होता. यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला होता. हा संसर्ग आफ्रिकेतील हिरव्या माकडामुळे (African Green Monkey) पसरला होता. त्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये या विषाणूचे रुग्ण अंगोला, कॉंगो, केनिया, दक्षिण आफ्रिका आणि युगांडामध्ये आढळून आले होते. आतापर्यंत इबोला (Ebola) विषाणू हा जगभरातील सर्वांत प्राणघातक मानला गेला आहे. इबोला हा फिलोव्हीरीडे (Filoviridae ) या कुळातला आहे. मारबर्ग हा विषाणूदेखील याच कुळातला आहे. हे दोन्ही विषाणू खूप धोकादायक आहेत. मारबर्ग हा इबोलाच्या तुलनेत वेगानं पसरतो असं बोललं जात आहे. अशा परिस्थितीत त्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, अन्यथा तो जीवघेणा ठरू शकतो. विशेष म्हणजे, इबोला विषाणूची पहिली केस कॉंगो (Congo) आणि सुदानमध्ये (Sudan) 1976 मध्ये समोर आली होती. पण 2014 आणि 2016 दरम्यान पश्चिम आफ्रिकेत इबोलाबाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढली होती. त्यावेळी सुमारे 28 हजार इबोलाबाधित रुग्ण आढळले होते. मारबर्गचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये ताप, तीव्र डोकेदुखी, डायरिया, अंगदुखी, उलट्या, मलातून रक्तस्त्राव होणं अशी लक्षणं दिसून येतात. याशिवाय नाक किंवा अन्य अवयवांमधून रक्तस्त्राव होऊ शकतो. मारबर्ग हा विषाणू वेगाने फैलावतो. त्यामुळे कोरोनाप्रमाणे या विषाणूबाबत सतर्क राहणं गरजेचं आहे.
First published:

Tags: Corona, Corona updates

पुढील बातम्या