जगात पहिल्यांदाच धाकटा भाऊ झाला राष्ट्राध्यक्ष आणि मोठा होणार पंतप्रधान; PM मोदींचं नव्या मित्राला निमंत्रण

जगात पहिल्यांदाच धाकटा भाऊ झाला राष्ट्राध्यक्ष आणि मोठा होणार पंतप्रधान; PM मोदींचं नव्या मित्राला निमंत्रण

श्रीलंकेचे नव्याने निवडून आलेले अध्यक्ष गोताबाय राजपक्ष Gotabaya Rajapaksa यांनी त्यांचे धाकटे बंधू महिंदा राजपक्ष यांची पंतप्रधानपदी नेमणूक केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून गोताबाय राजपक्ष आता भारत दौऱ्यावर येणार आहेत.

  • Share this:

कोलंबो, 21 नोव्हेंबर : श्रीलंकेचे नव्याने निवडून आलेले अध्यक्ष गोताबाय राजपक्ष Gotabaya Rajapaksa यांनी त्यांचे धाकटे बंधू महिंदा राजपक्ष यांची पंतप्रधानपदी नेमणूक केली. आता श्रीलंकेचा कारभार राजपक्ष कुटुंबाच्या हातात आहे. अध्यक्षपदी निवड झाल्या झाल्या श्रीलंकेचे हे नवे  नेते प्रथम भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून गोताबाय राजपक्ष भारत दौऱ्यावर येणार आहेत. अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा असेल.

श्रीलंकेतल्या निवडणुकीत माजी अध्यक्ष प्रेमदासा यांचा पराभव झाला आणि राजपक्ष निवडून आले. या शेजारी देशाच्या नव्या अध्यक्षाला पंतप्रधान मोदींनी लगोलग फोन करून अभिनंदन केलं. राजपक्ष हे चीनमित्र समजले जातात आणि त्यांची निवड होणं भारताच्या दृष्टीने हिंदी महासागरातल्या वर्चस्वाच्या दृष्टीने डोकेदुखी वाढवणारी ठरू शकेल, असं आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचं मत होतं. पण मोदींनी त्वरित राजकीय संबंध वाढवण्याची आणि शांततेसाठी एकत्रित प्रयत्न करण्याची इच्छा व्यक्त करत नव्या अध्यक्षांसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे.

पाकिस्ताननं केलं एक नेक काम! भारतीय विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं

राजपक्ष यांनीदेखील मोदींचे आभार मानत भारतात येण्याचं मान्य केलं आहे. येत्या 29 नोव्हेंबरला ते भारतात येतील. दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे मोदींचं आमंत्रण घेऊन स्वतः श्रीलंकेत गेले आणि गोताबाय राजपक्ष यांना भेटले. जयशंकर यांनी स्वतःच ट्वीट करून या भेटीसंदर्भातली माहिती दिली.

रोज ओढत होता एक डब्बा सिगारेट, फुफ्फुस पाहिल्यानंतर डॉक्टरही चक्रावरले!

धाकटा भाऊ महिंदा राजपक्ष हे श्रीलंकेचे माजी अध्यक्ष होते. आता ते पंतप्रधान म्हणून काम पाहतील. महिंदा राजपक्ष हे कडवे श्रीलंकन म्हणून लोकप्रिय आहेत. LTTE चा नायनाट करण्यात त्यांनी कठोर भूमिका बजावली म्हणून श्रीलंकन जनतेत ते लोकप्रिय आहे. त्यांच्याच काळात या तमिळ टायगर्स गटाचा खात्मा झालो होता.

भारत आणि श्रीलंका संबंधांमध्ये या तमिळ कनेक्शनमुळे तणाव होता. त्यातून महिंदा राजपक्ष यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत चीनला श्रीलंकेत आपलं बस्तान बसवायला मदत मिळाली. 2017 मध्ये चीनने लंकेतलं हंबानटोटा बंदर घेतलं आणि हिंदी महासागरात सामरिक वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घडामोडींमुळे भारताला धोका निर्माण झाला.

First published: November 21, 2019, 8:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading