197 दिवस अंतराळात राहिल्यानंतर 'तो' चालणंच विसरला; VIDEO वायरल

197 दिवस अंतराळात राहिल्यानंतर 'तो' चालणंच विसरला; VIDEO वायरल

नासाचा कमांडर असलेल्या जे ड्र फीउस्टेल या अंतराळवीराने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये 6 स्‍पेसवॉक पूर्ण केले.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 डिसेंबर : अंतराळाचा एकदा तरी सफर करावी असं प्रत्याकाला वाटत असतं. पण, अंतराळात दिर्घकाळ राहिल्यानंतर पृथ्वीवर कोणकोणत्या समस्या उद्भवतात हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. अंतराळात 197 दिवस राहिलेला एजे ड्र फीउस्‍टेल हा अंतराळवीर पृथ्वीवर आल्यानंतर चक्क चालणंच विसरला.

फीउस्‍टेल ने पृथ्वीवर परतल्यानंतरचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडिया शेयर केला आहे. ''वेलकम होम! स्पेस स्टेशन मध्ये 197 दिवस राहिल्यानंतर 5 ऑक्टोबर जेव्हा मी पृथ्वीर परतलो, तेव्हा मी असं चालत होतो'' असं त्यानं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलंय.

अंतराळवीर फीउस्‍टेल जेव्ही पृथ्वीवर परतला तेव्हा त्याला त्याला चालताच येत नव्हतं. दिर्घकाळ अंतराळात राहिल्यामुळे तो चालणच विसला होता. काही पावलं पुढे टाकत नाही तोच त्याचं संतुलन जात होतं. फीउस्‍टेलने हा जगावेगळ्या अनुभव व्हिडिओच्या स्वरुपात शेअर केला.

व्हिडिओमध्ये तो अडखळत-अडखळत चालत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. एवढंच नाही तर चालताना तो पडू नये म्हणून त्याचे सहकारी त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून त्याला आधार देताहेत. नासाचा कमांडर असलेला एजे ड्र फीउस्टेल आणि फ्लाइट इंजीनियर रिकी अर्नोल्ड यांनी या वर्षात आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये 6 स्‍पेसवॉक पूर्ण केले असल्याची माहिती आहे.

 VIDEO : 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोतांच्या गाडीवर भिरकावले टोमॅटो

First published: December 26, 2018, 11:10 PM IST

ताज्या बातम्या