मुंबई, 8 सप्टेंबर : अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट (Taliban Rule in Afghanistan) आल्यानंतर सर्वाधिक हाल हे महिलांवर होत आहेत. त्यांच्यावर घराच्या बाहेर पडण्यापासून ते शिक्षण आणि नोकरीपर्यंत प्रत्येक ठिकाणी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तालिबान राजवटीच्या विरोधात काबूलमध्ये शेकडो नागिरांनी निदर्शनं केली. या निदर्शनात महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. यावेळी तालिबानी दहशतवाद्याला निर्भयपणे सामोरी गेलेल्या एका महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Photo Viral) झाला आहे.
या व्हायरल फोटोत तालिबानी दहशतवाद्यानी बंदूक रोखली असून त्या बंदुकीच्या दहशतीला न घाबरता ती महिला उभी आहे. हा फोटो रॉयटर्सच्या फोटोग्राफरनं घेतलाय. पण काही वेळातच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अफगाणिस्तान महिलांची इच्छाशक्ती आणि निडरतेचा हा फोटो म्हणजे उदाहरण मानलं जात आहे.
An Afghan woman fearlessly stands face to face with a Taliban armed man who pointed his gun to her chest. Photo: @Reuters pic.twitter.com/8VGTnMKsih
— Zahra Rahimi (@ZahraSRahimi) September 7, 2021
असं आहे तालिबान राजवटीतील कॉलेज!
तालिबानने अफगाणिस्तानात (Afghannistan) कॉलेज सुरू करण्याचा (Taliban Reopen Colleges) निर्णय घेतला असल्याच्या बातम्या आणि त्यासंदर्भातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Photo Viral) झाले आहेत.
तालिबानने सुरू केलेल्या या शाळांमध्ये मुलं आणि मुलींना वेगळे बसवण्यात आले असून त्यांच्यामध्ये पडदे लावण्यात आले आहेत. या फोटोंमधून दावा करण्यात येत आहे, की अफगाणिस्तानात तालिबानच्या नियमांनुसार कॉलेज सुरू करण्यात आले असून त्यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला आहे. तालिबानच्या भितीने अनेक महिलांनी आपले शिक्षण अर्धवट सोडून दिले आहे. 24 वर्षीय आइना नावाच्या एका विद्यार्थीनीने एका वृत्तवाहीनीला मुलाखत देताना म्हटलं आहे, की तिच्या वर्गात फक्त 50 विद्यार्थी आहेत. त्यात फक्त 3 मुली उरल्या आहेत, बाकी सगळ्यांनी कॉलेज सोडून दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.