• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • EXCLUSIVE : अफगाणिस्तानच्या NSD ने आधीच दिला होता काबूल स्फोटाचा इशारा, तरीही हल्ला रोखण्यात अपयश

EXCLUSIVE : अफगाणिस्तानच्या NSD ने आधीच दिला होता काबूल स्फोटाचा इशारा, तरीही हल्ला रोखण्यात अपयश

काबूलमध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असा इशारा अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा निर्देशालयाने (NSD) अगोदर अमेरिकेला दिला होता.

 • Share this:
  काबुल, 27 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबाननं (Taliban) सत्ता मिळवल्यानंतर आता इतर दहशतवादी संघटना (Terrorist organizations) सक्रीय झाल्या आहेत. अफगाणिस्तानच्या राजधानीत काबूल विमानतळावर (Kabul airport) झालेल्या स्फोटात 105 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. काबूलमध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असा इशारा अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा निर्देशालयाने (NSD) अगोदर अमेरिकेला दिला होता. मात्र तरीही हा रोखण्यात अमेरिकेला अपयश आलं आहे. स्फोटाची योजना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटाची योजना कित्येक आठवडे आधीच शिजली होती. हक्कानी नेटवर्क हा स्फोट घडवून आणण्याची जबाबदारी पार पाडेल आणि आयसीस त्याची जबाबदारी घेईल, अशी माहिती गुप्तचरांडून एनएसडीला मिळाली होती. तशी सूचनादेखील एनएसडीकडून अमेरिकेला देण्यात आली होती. मात्र तरीही हा हल्ला अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा रोखू शकली नाही. आयसीस विरुद्ध तालिबान आयसीस-के (इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत) या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. ही दहशतवादी संघटना तालिबानला आपला शत्रू मानत असल्याचं या हल्ल्यातून पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्याचवेळी आयसीस आणि तालिबान यांचे आतून सलोख्याचे संबंध असून केवळ जगाला दाखवण्यापुरती दुश्मनी असल्याचा दावा अफगाणिस्तानचे स्वयंघोषित राष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी केला आहे. याचे पुरावे आपल्याकडे असल्याचंही सालेह यांनी म्हटलं आहे. या स्फोटात आतापर्यंत 105 जण ठार झाल्याची, तर 1138 नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मरण पावलेल्यांमध्ये 13 कमांडोंचाही समावेश आहे. हे वाचा -Kabul Airport Blast: 'मानवी अवयव हवेत उडत होते..', अंगावर काटा आणणारा अनुभव AFP नं दिलेल्या माहितीनुसार, काही लोक उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी गुडघाभर पाण्यात उभे होते. मात्र त्याचवेळी हा धमाका झाला आणि लोंकांच्या मृतदेहांचे खच पडले. आजूबाजूला रक्ताचा अक्षरशः चिखल झाल्याचं चित्र होतं. अनेकजण अफगाणिस्तानमधून बाहेर पडून सुरक्षित आयुष्य जगण्याचं स्वप्न घेऊन विमानतळावर चालले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांचं आयुष्य या स्फोटाने संपवलं. अनेक जखमींची कागदपत्रं, पासपोर्ट आणि इतर वस्तू या स्फोटात हरवल्या आहेत.
  Published by:desk news
  First published: