मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

कारमध्ये घडवून आणलेल्या भीषण स्फोटानं हादरलं काबूल, 9 जणांचा मृत्यू, संसद सदस्यासह 19 जखमी

कारमध्ये घडवून आणलेल्या भीषण स्फोटानं हादरलं काबूल, 9 जणांचा मृत्यू, संसद सदस्यासह 19 जखमी

दहशतवाद्यांनी खासदार खान मोहम्मद वार्डन यांना लक्ष्य करून हा स्फोट घडवून आणला आहे.

दहशतवाद्यांनी खासदार खान मोहम्मद वार्डन यांना लक्ष्य करून हा स्फोट घडवून आणला आहे.

दहशतवाद्यांनी खासदार खान मोहम्मद वार्डन यांना लक्ष्य करून हा स्फोट घडवून आणला आहे.

    काबूल, 20 डिसेंबर : अफगाणिस्तानमध्ये वारंवार स्फोटाच्या घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी सैन्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर आता संसदेला लक्ष्य करत हल्ला करण्यात आला आहे. कारमध्ये स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून संसदेच्या खासदारासह 19 जण गंभीर जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानात रक्तपात सुरूच आहेत. काबूलमध्ये झालेल्या कार स्फोटामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दहशतवाद्यांनी खासदार खान मोहम्मद वार्डन यांना लक्ष्य करून हा स्फोट घडवून आणला आहे. राजधानीच्या 5 नंबर जिल्ह्यातील स्पिन केळीजवळ जोरदार धमाका घडवून आणला. अफगाणिस्तानचे गृहमंत्री मसूद अंदर्बी यांनी हल्ल्याची माहिती दिली आहे. हे वाचा-VIDEO : भांडणाचा रुग्णालयावर काढला राग, थेट पिकअप गाडीनं 8 वेळा केली तोडफोड अफगाणिस्तानच्या टोलो न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार पीडी 5 च्या स्पिल केळी छेदनबिंदूमध्ये स्फोटकांनी भरलेले वाहन उडवण्यात आलं. या घटनेनंतर अफगाण सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. या परिसरात चौकशी सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले वाढत आहेत. याआधी झालेल्या रॉकेट हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. 29 नोव्हेंबर 2020 रोजी वेगवेगळ्या बॉम्बस्फोटात 34 लोकांचा मृत्यू झाला होता.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Terror acttack

    पुढील बातम्या