Home /News /videsh /

अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान राज, महिला आणि पुरुषांसाठी कठोर कायदे लागू

अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान राज, महिला आणि पुरुषांसाठी कठोर कायदे लागू

अमेरिकन सैन्यानं (US Army) माघार घेण्यास सुरुवात करताच अफगाणिस्तानात (Afghanistan) पुन्हा एकदा तालिबानी राजवट (Taliban Rule) परतली आहे.

    मुंबई, 2 जुलै: अमेरिकन सैन्यानं (US Army) माघार घेण्यास सुरुवात करताच अफगाणिस्तानात (Afghanistan) पुन्हा एकदा तालिबानी राजवट (Taliban Rule) परतली आहे. देशाच्या 80 टक्के जिल्ह्यांवर ताबा घेतल्याचा दावा तालिबाननं केला आहे. हा ताबा मिळवताच त्यांनी पुन्हा एकदा तालिबानी कायदे (Talibani Laws) लागू झाले आहेत. तालिबान राजवटीनं त्याच्या ताब्यातील प्रखार प्रांतामध्ये हे कायदे लागू केले आहेत. या कायद्यानुसार महिलांना एकट्यानं घराच्या बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असून पुरुषांना दाढी ठेवणे अनिवार्य आहे.  तालिबानने तरुणींना हुंडा देण्याबाबतही नवे कायदे केले आहेत. महिलांनी पुरुषांच्या सोबतीशिवाय घराच्या बाहेर पडू नये असा आदेश देण्यात आला असून या प्रकरणात पुराव्याशिवाय कारवाई करण्यावर तालिबानचा भर असतो, असं वृत्त पाकिस्तानधील 'द जंग' या वृत्तपत्राने दिले आहे. खाद्यपदार्थ महागले तखार प्रांतीय परिषदेनं दिलेल्या माहितीनुसार, 'तालिबानची सत्ता असलेल्या भागात खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. तेथील नागरिकांना अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये जगावं लागत आहे. त्या भागातील हॉस्पिटल आणि शाळा बंद आहेत. 'सरकारी इमारती नष्ट करण्यात आल्या असून  सर्व सरकारी सेवाही बंद करण्यात आली आहे,' अशी माहिती तखार प्रांताचे गव्हर्नर अब्दुल्ला कारलूक यांनी दिली आहे. 'तालिबाननं सर्व काही लुटलं आहे. आता कोणतीही सेवा शिल्लक नाही. स्थानिक लोकांना या प्रकारच्या परिस्थितीमध्ये जगणं अवघड आहे. तालिबानींचा बिमोड करण्यासाठी लवकरच अभियान सुरु करण्यात यावं,' अशी मागणी त्यांनी केली आहे. तालिबाननं हे सर्व आरोप फेटाळले असून आपल्याविरोधात अप्रचार सुरु असल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानातील भारतीय दूतावासात ड्रोनची घुसखोरी, सुरक्षा प्रोटोकॉलचा भंग अमेरिकेनं विमानतळ सोडला अफगाणिस्तानातील हेरात, कपिसा, तखार, बाल्ख, परवानस बघनान या प्रांतामध्ये अफगाणिस्तानचे सैन्य आणि तालिबानी हल्लेखोर यांच्यात जोरदार संघर्ष सुरु आहे. गेल्या 24 तासांमध्ये या संघर्षात 250 हल्लेखोरांना ठार मारल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. अफगाणिस्तानत यादवी पेटलेली असताना अमेरिकन सैन्य माघारीची प्रक्रिया वेगानं सुरु आहे. अमेरिकन सैन्यानं बगाराम विमानतळाचा ताबा सोडला आहे. अल-कायदा आणि तालिबान विरुद्ध दोन दशकांपूर्वी युद्ध सुरु असताना या विमानतळाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Afghanistan, International, World news

    पुढील बातम्या