मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

'बाळा सुखी राहा रे'; काळजाच्या तुकड्याला आईने सैनिकाकडे सोपवलं; हृदय पिळवटून टाकणारा तो क्षण

'बाळा सुखी राहा रे'; काळजाच्या तुकड्याला आईने सैनिकाकडे सोपवलं; हृदय पिळवटून टाकणारा तो क्षण

बाहेर तालिबान्यांचा गोळीबार सुरू होत, तर आईने काळजाचा तुकडा सैनिकाकडे सोपवला. ते दृश्य पाहून सैनिकाच्या डोळ्यातही अश्रू तरळले.

  • Published by:  Meenal Gangurde

काबुल, 21 ऑगस्ट : अफगानिस्तानमधून (Afghanistan) आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी काबुल विमानतळावर मोठी गर्दी जमा होत आहे. येथे ब्रिटीश आणि अमेरिकन सैनिक दररोज काळीज पिळवटून टाकणारी दृश्य पाहत आहे. (US & UK Troops) काबुलवर तालिबान्यांनी नियंत्रण मिळविल्यानंतर देशभरात जी परिस्थिती निर्माण झाली ती पाहून जगातील प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यात अश्रू तरळत असेल. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अशी अनेक दृश्य पाहून सैनिकांच्या अंगावर काटा उभा राहत आहे. एका दृश्यात तर अफगान महिला आपल्या पोटच्या गोळ्याला सैनिकाकडे सोपवताना दिसत आहे. आपल्या बाळाला या नरकातून बाहेर काढण्यासाठी महिलेने स्वत:च्या हृदयावर दगड ठेवून त्याला आपल्यापासून दूर केलं.

Troops कडे केली विनंती

‘द सन’च्या बातमीनुसार, शुक्रवारी काबुल एअरपोर्टवर अफगान नागरिकांमध्ये अगतिकता दिसून आली. मोठ्या संख्येने लोक आपल्या मुलांना घेऊन विमानतावर पोहोचले आणि अमेरिकन सैनिकांना त्यांच्यापासून वाचविण्यासाठी मदतीची याचना करीत राहिले. एका कुटुंबाने तालिबानच्या दहशतीचा हवाला देत आपल्या नवजा बाळाला सैनिकांकडे सोपवलं. ज्यानंतर सैनिकांनीही बाळाला उचलून घेतलं.

हे ही वाचा-अफगणिस्तानमधील नागरिकांची तालिबान्यांच्या दहशतीतून होणार सुटका; UAEची मोठी घोषणा

Airport च्या आत सैनिक, बाहेर Taliban

रडत रडत आई-बापाने आपल्या बाळाच्या बचावासाठी अमेरिकन सैनिकाकडे मदतीची याचना केली. त्यानंतर एक सैनिक ताऱ्यांच्या कुंपणावरुन खाली झुकला आणि बाळाचा उचलून घेतलं. हे पाहून घटनास्थळावरील सैनिकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सांगितलं जात आहे की काबुल एअरपोर्टवर अमेरिकेन आणि ब्रिटीश सैनिकांचा कब्जा आहे. मात्र बाहेर तालिबानी आहेत. हे दहशतवादी विमानतळावर येणाऱ्या अफगणिस्तानच्या नागरिकांना मारत आहेत. त्यामुळे महिलांचा हाच प्रयत्न असतो की, सर्वात आधी कसं बसं करून आपल्या मुलांना सैनिकांकडे सुपूर्द केलं जावं.

अफगाणिस्तान (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) कब्जात आलं आहे. देशातील राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि अधिकतर राजकीय नेते देश सोडून पळून जात आहेत. सर्वत्र गोंधळाचं, भीतीचं वातावरण आहे. सर्वसामान्य जनता देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहे, परंतु सर्व रस्ते बंद झाल्याने त्यांना बाहेर पडता येत नाही. विमानं रद्द करण्यात आल्यानंतर लोक रनवेवर जमले आहेत. एखादं विमान येईल आणि बाहेर पडता येईल या आशेवर ते आहेत. अफगाणिस्तानातील अतिशय विदारक परिस्थिचे फोटो समोर आले आहेत.

नंतर बाळाची भेट घालून दिली

मिळालेल्या बातमीनुसार, काही वेळाने बाळाला त्याच्या आई-वडिलांकडे देण्यात आलं. या पालकांनी बाहेर निघण्यासाठी तालिबीन्यांच्या दहशतीचा, गोळ्यांचा सामना केला होता. काबुल विमानतळावर गेल्या अनेक दिवसांपासून असे दृश्य वारंवार दिसून येत आहे. नुकत्याच एका अफगानी महिलेने माझ्या मुलाला वाचवा, म्हणत बाळाला सैनिकांकडे फेकलं होतं, सुदैवाने वेळेत त्याने बाळाला पकडलं.

First published:

Tags: Afghanistan, Mother, Taliban