मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

हक्कानीच्या बंदीवर भडकला तालिबान, अमेरिकेला धमकी देत म्हणाले...कोणत्याही प्रकारची बंदी खपवून घेतली जाणार नाही

हक्कानीच्या बंदीवर भडकला तालिबान, अमेरिकेला धमकी देत म्हणाले...कोणत्याही प्रकारची बंदी खपवून घेतली जाणार नाही

आता अफगाणिस्तानमध्ये (afghanistan) तालिबानच्या नवीन सरकारबद्दल अमेरिकेनं चिंता व्यक्त केली आहे.

आता अफगाणिस्तानमध्ये (afghanistan) तालिबानच्या नवीन सरकारबद्दल अमेरिकेनं चिंता व्यक्त केली आहे.

आता अफगाणिस्तानमध्ये (afghanistan) तालिबानच्या नवीन सरकारबद्दल अमेरिकेनं चिंता व्यक्त केली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

काबूल, 09 सप्टेंबर: तालिबाननं (Taliban) मंगळवारी आपल्या नव्या सरकारची घोषणा केली. तालिबाननं अमेरिकेतील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सिराजुद्दीन हक्कानीला (Sirajuddin Haqqani) अफगाणिस्तानचा नवा गृहमंत्री म्हणून नियुक्त केलं. आता अफगाणिस्तानमध्ये (afghanistan) तालिबानच्या नवीन सरकारबद्दल अमेरिकेनं चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या मते, ज्यांना सरकारमध्ये जोडलं गेलं आहे त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड विश्वास ठेवण्यासारखा नाही आहे. आता अमेरिकेच्या या विधानावर तालिबान भलताच भडकला आहे.

तालिबान म्हणालं की, इस्लामिक अमीरातबाबत अमेरिका आणि इतर देशांद्वारे केलेली विधाने सहन करण्यायोग्य नाहीत. अशी वक्तव्ये त्वरित थांबवली पाहिजेत. अमेरिकेला आपल्या धोरणांमध्ये बदल केला पाहिजे.

अशी विधाने किंवा कोणत्याही प्रकारची बंदी खपवून घेतली जाणार नसल्याचं तालिबाननं स्पष्टपणे म्हटलं आहे. तालिबानने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेने हक्कानी गटाबाबत केलेलं वक्तव्य पूर्णपणे दोहा कराराचे उल्लंघन आहे.

तालिबाननं म्हटलं की, हक्कानीचे कुटुंब देखील इस्लामिक अमिरातचा भाग आहे. तो काही वेगळा नाही. अशा परिस्थितीत, दोहा कराराअंतर्गत, इस्लामिक अमीरातच्या सर्व सदस्यांना संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेच्या ब्लॅक लिस्टमधून त्वरित काढून टाकावं. याची मागणी बऱ्याच काळापासून आहे.

बोट बुडतानाचा Live Video, पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहील

अमेरिकेचं बक्षीस

सिराजुद्दीन हक्कानीचे नावही जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत आहे. त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला अमेरिकेनं 50 लाख डॉलरचं बक्षीस जाहीर केलं आहे. तालिबानी सरकारमध्ये मुल्ला मोहम्मद हसन अखुंद (Mullah Mohammad Hasan Akhund) यांना पंतप्रधान करण्यात आले आहे. तालिबानचा नंबर दोन नेते म्हणून मुल्ला गनी बरादर (Mulla Ghani Baradar) उप पंतप्रधानांच्या भूमिकेत असतील. बरदार यांच्यासह मुल्ला अब्दास सलाम यांनाही मोहम्मद हसन अखुंद यांची उपपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

400 हून अधिक लोकांची चौकशी, 150 CCTV कॅमेऱ्यांचा तपास; आरोपी निघाला मुलगाच

पाकिस्तानच्या उत्तर वजीरिस्तानचा आहे हक्कानी

दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्क चालवणारा सिराजुद्दीन हक्कानी पाकिस्तानच्या उत्तर वजीरिस्तानमधील मीराम शाह भागातला असल्याचं बोललं जातं. हक्कानी नेटवर्कच्या या टॉप दहशतवाद्याचे नाव अजूनही एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड यादीत समाविष्ट आहे.

15 हजार दहशतवादी हक्कानी नेटवर्कशी संबंधित

हक्कानी नेटवर्कच्या ऑपरेशनचं नेतृत्व जलालुद्दीन हक्कानीचा मुलगा सिराजुद्दीन हक्कानी करत आहे. असे म्हटले जाते की क्रूरतेच्या बाबतीत तो आपल्या वडिलांच्या पुढे आहे. सिराजुद्दीन 2008 ते 2020 पर्यंत अफगाणिस्तानात अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी आहे. 15 हजार दहशतवादी हक्कानी नेटवर्कशी संबंधित असल्याचंही सांगितलं जातं.

First published:

Tags: Afghanistan, Taliban