Home /News /videsh /

अफगाणिस्तानात हिंसाचाराची धग तीव्र; पंजशीरमध्ये 600 तालिबान्यांचा खात्मा; नॉर्दन आघाडीचा दावा

अफगाणिस्तानात हिंसाचाराची धग तीव्र; पंजशीरमध्ये 600 तालिबान्यांचा खात्मा; नॉर्दन आघाडीचा दावा

1996 ते 2001 दरम्यान तालिबान राजवटीतही तालिबानला पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवता आला नव्हता.

1996 ते 2001 दरम्यान तालिबान राजवटीतही तालिबानला पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवता आला नव्हता.

Afghanistan Crisis: काबूलपासून उत्तरेकडे 100 किमी अंतरावर असणाऱ्या पंजशीर खोऱ्यात (Violence in Panjshir Valley) अद्याप तालिबानला नियंत्रण मिळवता आलं नाही. त्यामुळे याठिकाणी तालिबान आणि नॉर्दन आघाडीत मागील बऱ्याच दिवसांपासून संघर्ष सुरू आहे.

पुढे वाचा ...
    काबूल, 05 सप्टेंबर: तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा (Taliban Control Afghanistan) मिळवल्यापासून देशात हिंसाचार वाढत चालला आहे. तालिबान संघटना एकीकडे सरकार बनवण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे पंजशीरमध्ये नॉर्दन आघाडीच्या (Northern Alliance) सैनिकांशी लढा देत आहे. काबूलपासून उत्तरेकडे 100 किमी अंतरावर असणाऱ्या पंजशीर खोऱ्यात (Violence in Panjshir Valley) अद्याप तालिबानला नियंत्रण मिळवता आलं नाही. त्यामुळे याठिकाणी तालिबान आणि नॉर्दन आघाडीत मागील बऱ्याच दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांकडून पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा करण्यात येत आहे. पण याची अधिकृत पुष्टी होऊ शकली नाही. यानंतर आता, तालिबानच्या 600 बंडखोरांना ठार (600 taliban Commander died) केल्याचा दावा नॉर्दन आघाडीकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर जवळपास 1000 तालिबान्यांना कैद केल्याचंही आघाडीकडून सांगण्यात आलं आहे. यातील अनेकांनी शरणागती पत्करल्याचं म्हटलं आहे. स्पुतनिक न्यूजच्या मते, हा दावा नॉर्दन आघाडीचे प्रवक्ते फहीम दशती यांनी एका ट्विटद्वारे केला आहे. विशेष म्हणजे तालिबाननं शनिवारी पंजशीरवर कब्जा केल्याचा दावा केला होता. पण यानंतर नॉर्दन आघाडीचे नेते अमरुल्ला सालेह यांनी हा दावा नाकारला आहे. हेही वाचा-राणी एलिझाबेथवर कसे होणार अंत्यसंस्कार? गुप्त तपशीलातून माहिती उघड पंजशीर असा एकमेव प्रांत आहे, ज्यावर तालिबानला अद्याप ताबा मिळवता आला नाही. माजी अफगाण गोरील्ला कमांडर अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद आणि कार्यवाहक राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या नेतृत्वात याठिकाणी तालिबान विरुद्ध लढा दिला जात आहे. विशेष म्हणजे 1996 ते 2001 दरम्यान तालिबान राजवटीतही तालिबानला पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवता आला नव्हता. यानंतर आताही संपूर्ण देश तालिबानच्या ताब्यात गेला असला तरी, पंजशीरमध्ये अद्याप संघर्ष सुरूच आहे. दरम्यान पंजशीर प्रांतातील 7 पैकी 4 जिल्ह्यांवर ताबा मिळवल्याचा दावा तालिबानकडून करण्यात आला आहे. हेही वाचा-तालिबानचा आनंद गगनात मावेना, हवेत केलेल्या गोळीबारात अनेकांचा मृत्यू सालेह यांचा व्हिडीओ संदेश अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी एका व्हिडीओ संदेश प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये सालेह यांनी सांगितलं की, 'दोन्ही गटाकडून पंजशीरमध्ये युद्ध सुरूच आहे. 'आम्ही कठीण परिस्थितीत आहोत यात काही शंका नाही. तालिबान्यांनी आमच्यावर हल्ला केला आहे. पण आम्ही शरणागती पत्करणार नाही. आम्ही अफगाणिस्तानसाठी शेवटपर्यंत लढत राहू. मी देश सोडल्याच्या बातम्या खोट्या आहेत हे लोकांना आश्वासन देण्यासाठी मी हा व्हिडीओ शेअर केला आहे.'
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Afghanistan, Taliban

    पुढील बातम्या