मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

काबूल विमानतळावर पुन्हा चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू

काबूल विमानतळावर पुन्हा चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू

Afghanistan Crisis: काबूल विमानतळावरुन (Kabul Airport) पुन्हा एकदा वाईट बातमी समोर आली आहे.

Afghanistan Crisis: काबूल विमानतळावरुन (Kabul Airport) पुन्हा एकदा वाईट बातमी समोर आली आहे.

Afghanistan Crisis: काबूल विमानतळावरुन (Kabul Airport) पुन्हा एकदा वाईट बातमी समोर आली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

काबूल, 22 ऑगस्ट: काबूल विमानतळावरुन (Kabul Airport) पुन्हा एकदा वाईट बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानातील सामान्य नागरिक ठार झाल्याचं वृत्त समजतंय. रविवारी ब्रिटिश लष्कराने जारी केलेल्या निवेदनानुसार आंतरराष्ट्रीय विमानतळावर चेंगराचेंगरीत सात अफगाण (Afghanistan) नागरिक ठार झाले आहेत. लष्करानं म्हटलं आहे की, तालिबान्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी देश सोडून जाणाऱ्या लोकांना अजूनही धोका असल्याचे दिसून आले आहे. यूकेच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून असे म्हटले आहे की, विमानतळावरील परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक आहे. मात्र आम्ही परिस्थिती सामान्य करण्यासाठी आणि लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.

गेल्या रविवारी काबूलवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर विमानतळावर मोठ्या संख्येनं लोकं गर्दी करु लागले होते.

म्हणून हा ब्रिटीश नागरिक अफगाणिस्तान सोडायला नाही तयार; कारण वाचून वाटेल अभिमान

काबूल विमानतळावर हल्ला होण्याची शक्यता

आता अमेरिकेनं (America)दिलेल्या इशाऱ्यामुळे लोकांची चिंता आणखीनच वाढली आहे. अमेरिकेनं आपल्या नागरिकांना इशारा दिला आहे. या इशाऱ्यात अमेरिकेनं म्हटलं आहे की, काबूल विमानतळाजवळ (Kabul Airport) येऊ नका. काबूल विमानतळावर इस्लामिक स्टेट (IS) हल्ला करण्याची भीती त्यांना सतावतेय. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या नागरिकांना आधीच सतर्क केले आहे.

काबूल विमानतळावर सतत गोंधळ सुरूच आहे. देश सोडण्यासाठी हजारो लोकं विमानतळावर गर्दी करत आहेत. त्यांच्या नियंत्रणासाठी अमेरिकन सैन्य तैनात आहे. अफगाणिस्तानात परिस्थिती सतत बिकट होत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेनं आता आपल्या नागरिकांना विमानतळाकडे जाण्यास पूर्णपणे मनाई केली आहे. सध्या काबूल विमानतळाचे नियंत्रण अमेरिकन सुरक्षा दलांच्या हातात आहे.

भारतात आलेल्या अफगाणी नागरिकांना अश्रू अनावर;  म्हणाले... 

अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यानं सांगितले की, त्यांनी विमानतळाच्या दाराबाहेर मोठी गर्दी जमू नये यासाठी सूचना जारी केल्या आहेत. सद्यस्थितीत विमानतळावर परिस्थिती बिकट आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी परतल्यानंतर तालिबान्यांनी आता राजधानी काबुलला चारही बाजूंनी घेरले आहे. यामुळेच देशात हल्ल्यांचा धोका आणखी वाढला आहे.

First published:

Tags: Afghanistan, Kabul