Home /News /videsh /

Afghanistan Crisis LIVE: काबूल एअरपोर्टबाहेर मोठा स्फोट; 60 जणांचा मृत्यू

Afghanistan Crisis LIVE: काबूल एअरपोर्टबाहेर मोठा स्फोट; 60 जणांचा मृत्यू

Kabul Airport Blast: या स्फोटात नेमकं किती नुकसान झालं, किती जणांचे प्राण गेले याबाबत अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

    काबूल, 26 ऑगस्ट: अफगाणिस्तानात (Afghanistan Crisis) तालिबानी (Taliban) सत्ता आल्यानंतर हिंसा सुरूच आहे. काबूल विमानतळाबाहेर मोठा बाँबस्फोट (Blast outside Kabul Airport) झाल्याचं वृत्त आहे. भीषण स्फोट झाल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगत असल्याच्या बातम्या आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिल्या आहेत. या स्फोटामध्ये 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात नेमकं किती नुकसान झालं, किती जणांचे प्राण गेले याबाबत अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण अमेरिकेची संरक्षण यंत्रणा अर्थात पेंटागॉनने या स्फोटाच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे. अनेक लोक या स्फोटात जखमी झाले असण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानबद्दल बोलताना सांगितलं की, भारताचं पहिलं प्राधान्य तिथे अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यासाठी दिले आहे. पण, भारतीय विमान सेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नियमित विमान (Flights to Kabul) उड्डाणामुळे क्रू आणि प्रवासी दोघांनाही धोका असण्याची शक्यता आहे, अशी भीती सूत्रांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेने आज काबूल एटीसी (Air traffic control)सोडलं. त्यानंतर भारतातून आणखी काही विमानाचं उड्डाण करणं अवघड आहे. गुरुवारी शेवटच्या रेस्क्यूनंतर पुढील आदेश येईपर्यंत भारतीय उड्डाणे निलंबित राहतील. दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानबद्दल बोलताना सांगितलं की, भारताचं पहिलं प्राधान्य तिथे अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका हे आहे. पण या ताज्या घडामोडींमुळे भारतीय विमान सेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नियमित विमान (Flights to Kabul) उड्डाणामुळे क्रू आणि प्रवासी दोघांनाही धोका असण्याची शक्यता आहे, अशी भीती सूत्रांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेने आज काबूल एटीसी (Air traffic control)सोडलं. त्यानंतर भारतातून आणखी काही विमानाचं उड्डाण करणं अवघड आहे. गुरुवारी शेवटच्या रेस्क्यूनंतर पुढील आदेश येईपर्यंत भारतीय उड्डाणे निलंबित राहतील.  
    First published:

    Tags: Afghanistan, Breaking News, Kabul, Taliban

    पुढील बातम्या