गजनी, 29 नोव्हेंबर : भारतात माओवाद्यांकडून सीआरपीएफच्या जवानांवर शनिवारी रात्री हल्ला करण्यात आला आणि त्यामध्ये 10 जवान जखमी झाले. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये कारमध्ये स्फोटकं ठेवून सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करण्यात आला आहे. कारमध्ये स्फोट घडवून आणत सुरक्षा दलातील जवानांना लक्ष्य करण्यात आलं. या भीषण हल्ल्यात 30 सुरक्षा दलाचे जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
रॉयटर्स न्यूज एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार हा स्फोट कारमध्ये घडवून आणण्यात आला आणि या हल्ल्यात 30 जवानांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आतापर्यंत सैनिकांवर अलीकडच्या काळात झालेल्या हल्ल्यापैकी हा हल्ला सर्वात मोठा होता. ज्या परिसरात जवानांवर हा हल्ला करण्यात आला त्या भागात अफगाणिस्तान सरकार विरुद्ध तालिबान असं युद्ध देखील सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
#BREAKING Car bomb kills at least 26 Afghan security personnel: officials pic.twitter.com/5NOex3RHl4
— AFP News Agency (@AFP) November 29, 2020
#UPDATE A suicide car bomber struck an army base in Afghanistan on Sunday killing at least 26 security personnel, officials said, in one of the bloodiest attacks in recent monthshttps://t.co/l6uz9TV2zK pic.twitter.com/vI4CEhXYoj
— AFP News Agency (@AFP) November 29, 2020
गजनी रुग्णालयाचे संचालक बाझ मोहम्मद हेमात यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 30 जवानांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत तर 17 जखमी जवानांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलं आहे. हे सर्व सुरक्षा कर्मचारी असल्याची माहिती देखील मिळाली आहे.
टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, रविवारी सकाळी स्फोटकांनी भरलेली कार सुरक्षा दलाच्या युनिवर सोडून हा स्फोट घडवण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रशासन आणि जवानांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.