Home /News /videsh /

धक्कादायक! मशिदीत सुरू होतं बाँब बनवण्याचं ट्रेनिंग; स्फोटात 30 दहशतवादी ठार झाल्यानं आलं उघडकीस

धक्कादायक! मशिदीत सुरू होतं बाँब बनवण्याचं ट्रेनिंग; स्फोटात 30 दहशतवादी ठार झाल्यानं आलं उघडकीस

अफगाणिस्तानात एका मशिदीत दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र होते. तिथे बॉम्ब तयार करण्याचं प्रात्यक्षित दिलं जात असतानाच स्फोट झाला आणि त्यात 30 दहशतवादी मारले गेल्याचं वृत्त आहे.

    काबूल, 16 फेब्रुवारी: अफगाणिस्तानात तालिबानी अतिरेक्यांची कारस्थानं एका बाँबस्फोटाने उघड झाली आहेत. एका मशिदीत दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र होतं. तिथे बाँब तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं. प्रात्यक्षिकादरम्यान मशिदीत स्फोट झाला आणि हे कारस्थान उघड झालं. या स्फोटात किमान 30 दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज आहे. या प्रशिक्षण केंद्रात फक्त तालिबानीच नाही, तर विदेशातून आलेले तरुणही प्रशिक्षण घेत होते. जहालवाद्यांकडून दहशतवादी तयार करण्याचं काम तिथे सुरू होतं. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये 6 जण परकीय दहशतवादी असल्याचं वृत्त आहे. बाँब तयार करायचं प्रशिक्षण द्यायलाच हे परदेशी दहशतवागी आले होते. अफगाणिस्तानातल्या बाल्फ प्रांतात दौलताबाद जिल्ह्यातही ही घटना आहे. स्थानिक वृत्तानुसार, कुल्ताक नावाच्या गावातल्या मशिदीत अतिरेक्यांचं प्रशिक्षण केंद्र होतं. त्यात बाँब बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात येत होतं. 6 परकीय दहशतवादी ट्रेनिंग देत होते. तेसुद्धा या स्फोटात ठार झाले आहेत. IED स्फोटकांपासून बाँब कसा तयार करायला हे त्यांना शिकवलं जात होतं. पाक मंत्र्याचा कहर: नळकांड्या खराब होऊ नयेत म्हणून कर्मचाऱ्यांवर अश्रुधूर भूसुरुंग कसे पेरायचे, त्यासाठी स्फोटकं कशी जोडायची याचं प्रशिक्षण या मशिदीत दिलं जात होतं, असं स्थानिक माध्यमांचं वृत्त आहे. अफगाणिस्तानच्या मंत्रालयाचे प्रवक्ते फवाद अमन यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, मशिदीतला स्फोट एवढा जबरदस्त शक्तिशाली होता की, आतलं कुणीही वाचलं नाही. सगळ्यांचाच या स्फोटात मृत्यू झाला आहे. Google ने दिशाभूल केल्याचा आरोप; 11 लाख युरोचा दंड भरावा लागणार तालिबान्यांनी मात्र स्फोट झाल्याचं मान्य करत असताना किती दहशतवाद्यांचे प्राण गेले, त्याबद्दल मौन बाळगलं आहे.
    First published:

    Tags: Afghanistan, Bomb Blast, Terrorist

    पुढील बातम्या