• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • BREAKING NEWS: अफगाणिस्तानचा शेवटचा बुर्जही ढासळला, तालिबान काबुलमध्ये दाखल

BREAKING NEWS: अफगाणिस्तानचा शेवटचा बुर्जही ढासळला, तालिबान काबुलमध्ये दाखल

तालिबानी बंडखोर राजधानी काबूलमध्येही दाखल झाले आहेत.

तालिबानी बंडखोर राजधानी काबूलमध्येही दाखल झाले आहेत.

Taliban Enters in Kabul: येत्या दोन तासांत काबूलही काबीज करू असा दावा तालिबानच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

  • Share this:
    काबूल, 15 ऑगस्ट: तालिबान दहशतवादी संघटनेनं आतापर्यंत अफगाणिस्तानातील सर्व प्रमुख शहरांवर आपला ताबा घेतला आहे. यानंतर आता तालिबानी बंडखोर राजधानी काबूलमध्येही दाखल झाले आहेत. येत्या दोन तासांत काबूलही काबीज करू असा दावा तालिबानच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. तालिबान संघटनेचे हल्लेखोर काबूल शहरात दाखल झाल्याची झाल्याची पुष्टी एएफपी वृत्तसंस्थेनं स्थानिक लोकांच्या हवाल्यानं केली आहे. याआधी, अफगाणिस्तानचे एक खासदार आणि तालिबाननं म्हटलं होतं की अतिरेक्यांनी काबूलपासून पश्चिमेकडे काही अंतरावर असणाऱ्या एका प्रांताच्या राजधानीवर ताबा मिळवला आहे. तालिबानच्या अधिकाऱ्यांनी CNN News18 ला सांगितलं की, काबूल शहरातील नागरिक आमच्यासोबत आहेत. त्यामुळे अफगाण सरकारनं हे शहर आमच्या ताब्यात द्याव. आम्हाला याठिकाणी हिंसाचार करायचा नाही. आम्ही अफगाण सरकारच्या घोषणेची वाट पाहणार आहोत. हेही वाचा-'पुरुष बरोबर नसेल तर बाजारात जायचं नाही, सँडल नाहीत'; तालिबानी राजवटीत नवी बंधनं तत्पूर्वी, पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी सांगितलं की, तालिबाननं तोरखम सीमेवर नियंत्रण मिळवलं आहे. याबाबत माहिती देताना शेख रशीद अहमद यांनी स्थानिक ब्रॉडकास्टर जिओ टीव्हीला सांगितलं की, पाकिस्ताननं सीमापार होणारी वाहतूक बंद केली आहे. तोखरम ही अफगाण सरकारच्या नियंत्रणाखालीलं शेवटचं ठिकाण होतं. हेही वाचा-अफगाण सैन्याचं तालिबानसमोर लोटांगण; सर्वात मोठ्या चौथ्या शहरावरही ताबा तालिबानी बंडखोर अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेनं पुढं येत असताना काबूलमधील अमेरिकन दूतावासाबाहेर राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. याठिकाणी अमेरिकेचे अनेक हेलिकॉप्टर उतरवले जात आहेत. त्याचबरोबर अमेरिकन अधिकाऱ्यांनी संवेदनशील कागदपत्रे मिटवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दूतावास परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट तयार झाले होते.
    Published by:News18 Desk
    First published: