मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

एअरपोर्टच्या कुंपणावरून आपल्या मुलांना अक्षरशः आत फेकतायत महिला; अफगाणींचा देश सोडण्यासाठी आटापिटा

एअरपोर्टच्या कुंपणावरून आपल्या मुलांना अक्षरशः आत फेकतायत महिला; अफगाणींचा देश सोडण्यासाठी आटापिटा

ब्रिटीश सैनिकाने सांगितला भयंकर अनुभव. अनेक अफगाणी महिला आपली मुलं रेंजर तारांवरून पलीकडे फेकत होत्या. काही मुलं तारांमध्येच अडकून पडली.

ब्रिटीश सैनिकाने सांगितला भयंकर अनुभव. अनेक अफगाणी महिला आपली मुलं रेंजर तारांवरून पलीकडे फेकत होत्या. काही मुलं तारांमध्येच अडकून पडली.

ब्रिटीश सैनिकाने सांगितला भयंकर अनुभव. अनेक अफगाणी महिला आपली मुलं रेंजर तारांवरून पलीकडे फेकत होत्या. काही मुलं तारांमध्येच अडकून पडली.

काबूल, 21 ऑगस्ट: अफगाणिस्तानमधून (Afghanistan Crisis) अमेरिकेने (America) आपले सैन्य माघारी बोलावल्यानंतर अल्पावधीतच तालिबानींनी (Talibani) अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. यामुळे तिथे अराजक निर्माण झालं असून, नागरिक भयभीत झाले आहे. तालिबान्यांच्या भीतीमुळे नागरिक देश सोडण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. अमेरिकी हवाई दलाचे (American Air Force) जेट विमान रनरेवरुन उड्डाण करत असताना शेकडो अफगाणी नागरिकांनी त्या जेटभोवती गर्दी केली होती. काहीजण जेटच्या चाकांना लटकण्यात यशस्वी झाले तसेच काही जण जेटच्या पंखांवर जाऊन बसले. यानंतर यातील काहीजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशी स्थिती असताना देखील येथील नागरिक देशाबाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. अशातच काबूल विमानतळावर अमेरिकी, ब्रिटनचे सैनिक आणि अफगाण नागरिकांना वेगवेगळं करण्यासाठी तारेचं कुंपण घालण्यात आलं आहे. परंतु, देश सोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही अफगाणी महिला आपल्या लहान मुलांना तारेच्या कुंपणापलीकडे फेकताना दिसत आहेत. अशातच काही मुलं या कुंपणांमध्येच अडकून बसल्याचे, एका वृत्तात म्हटलं आहे. हा सर्व प्रकार नेमका काय आहे, जाणून घेऊया सविस्तर... याबाबतचं वृत्त `लाइव्ह हिंदुस्थान डॉट कॉम`ने दिलं आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती सध्या खूपच चिंताजनक आहे. तालिबानींनी राजधानी काबूलवर (Kabul) ताबा मिळवल्यानंतर येथील नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत. तालिबान्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी बहुसंख्य नागरिक देशाबाहेर जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. अशा नागरिकांची मोठी गर्दी काबूल विमानतळावर पाहायला मिळत आहे. तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर ताबा मिळवल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी पलायन केले आहे. अफगणिस्तान संकटात, तर न्यूयॉर्कमध्ये आयुष्याचा आनंद घेतेय राष्ट्राध्यक्षांची लेक त्यानंतर काबूल विमानतळावर हताश नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक महिला आपल्या मुलांना घेऊन विमानतळावर सैरावरा धावताना दिसत आहेत. गर्दी नियंत्रणात येण्यासाठी अमेरिकी सैन्याने येथे गोळीबार देखील केला होता. त्यातच देश सोडून जाणाऱ्या नागरिकांपासून अमेरिकी आणि ब्रिटनच्या सैनिकांना वेगळं करण्यासाठी काबूल विमानतळावर रेंज वायर (Range Wire) लावण्यात आली आहे. तारांचे कुंपण आणि दरवाज्यांमागून अफगाणी पुरुष आणि महिला या जवानांकडे मदतीची याचना करताना दिसत आहेत. यातच काही महिला आपली मुलं या तारांच्या कुंपणांवरुन पलीकडे फेकताना दिसून आल्या आहेत. काबूल विमानतळावर तालिबानकडून AK47 नं लोकांवर गोळीबार महिला आपली मुलं रेंजर तारांवरुन पलीकडे फेकत होत्या. हे दृश्य खरोखरच भयानक होतं. या सैनिकांनी आपल्या मुलांना घ्यावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र यातील काही मुलं तारांमध्येच अडकून पडली असल्याचे एका ब्रिटीश सैनिकाने सांगितले. Video: ''आम्हाला बाहेर काढा, तालिबान मारुन टाकेल'', लहानग्या मुलीचा आक्रोश स्काय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानींना विरोध करण्यासाठी तसेच मदतीसाठी आक्रोश करणाऱ्या हजारो अफगाणी नागरिकांच्या आवाजाने हा परिसर दणाणून गेला आहे. रात्रीच्या वेळी काही अफगाणी महिला आपल्या मुलांना तारांच्या कुंपणांवरुन पलीकडे फेकत असल्याचे आमच्या सैनिकांनी पाहिले. या मुलांना आमच्या सैनिकांनी पकडावे, अशी विनंती त्या करत असल्याचे ब्रिटीश सैन्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
First published:

Tags: Afghanistan, Taliban

पुढील बातम्या