ऑस्ट्रेलियन अ‍ॅडल्ट स्टार भारतीयांवर भडकली; खटला भरण्याचीही दिली धमकी, हे आहे कारण

ऑस्ट्रेलियन अ‍ॅडल्ट स्टार भारतीयांवर भडकली; खटला भरण्याचीही दिली धमकी, हे आहे कारण

कार रेसिंग सोडून अ‍ॅडल्ट स्टार झाल्यानंतर ती एका आठवड्यात लाखोंमध्ये कमावते.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 जून : ऑस्ट्रेलियाची कार रेसर रेनी ग्रेसी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या कार रेसरने आपलं करिअर सोडून अ‍ॅडल्ट  इंड्रस्ट्रीत पाऊल ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियाची ही रेसर आता एक अ‍ॅडल्ट  स्टार झाली आहे. आता रेनी ग्रेसी भारतीयांविरोधात विधानं करीत आहे. भारतीयांबद्दल राग असल्याचं रेनी ग्रॅसीनं म्हटलं आहे.

रेनी ग्रेसीने ओनलीफॅन पेजवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये तिने वापरकर्त्यांना तिच्या नावावर सुरू असलेल्या खोट्या पेज बंद करण्याची आणि तिचं अकाऊंट बेकायदेशीरपणे वापर करण्याबाबत वक्तव्य केलं आहे. ती म्हणाली, ते माझ्या फोटोचा बेकायदेशीरपणे वापर करीत आहे. माझे व्हिडीओ आणि फोटो शेअर करणं बंद करा. आता मला भारतीय लोक आवडत नाहीत. ग्रेसीने भारतीय वापरकर्त्यांना अपशब्द वापरले आहेत आणि सर्व भारतीय वापरकर्त्यांना आपल्या पेजवरुन ब्लॉक करण्याची धमकीही दिली आहे. याशिवाय तिने भारतीय वापरकर्त्यांना खटला भरण्याचीही धमकी दिली आहे.

ऑस्ट्रेलियाची फुल टाइम सुपरकार रेसर रेनी ग्रेसीनं अ‍ॅडल्ट  स्टार होण्यासाठी कार रेसिंगला रामराम ठोकला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या पूर्व V8 सुपरकार ड्रायव्हरनं असा दावा केला आहे की, आता ती एका आठवड्यात 25 हजार डॉलर (19 लाख रुपये) महिन्याला कमावते. ग्रेसी 2008 मध्ये पहिल्यांदा फुल टाइम सुपर कार रेसर झाली होती. 2015 पर्यंत तिनं खूप चांगलं प्रदर्शन केलं. 2017 नंतर ग्रेसीचे रिजल्ट कमी झाल्यावर तिला स्पॉन्सर्स मिळणं बंद झालं. तिची जागा अन्य डायव्हर्सनी घेतली. आपलं पोट भरण्यासाठी ग्रेसीला गॅरेजमध्येही काम करावं लागलं. पण काही दिवसांतच ग्रेसीला समजलं की, यातूनं तिची आर्थिक परिस्थिती सुधरणार नाही. त्यामुळे तिनं पैसे कमवण्यासाठी अन्य मार्ग शोधायला सुरुवात केली.

हे वाचा-संगीत क्षेत्रातूनही लवकरच आत्महत्येचं वृत्त येऊ शकतं समोर; धक्कादायक खुलासा

First published: June 18, 2020, 10:59 PM IST

ताज्या बातम्या