News18 Lokmat

कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर होऊ शकतो पुनर्विचार- पाक उच्चायुक्त अब्दुल बासित

‘जोपर्यंत जाधव यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व दया याचिकांचा अवलंब केला जात नाही, तोपर्यंत त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार नाही,’ असं पाकिस्तान सरकारने पत्रकात म्हटलं होतं.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2017 12:40 PM IST

कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर होऊ शकतो पुनर्विचार- पाक उच्चायुक्त अब्दुल बासित

21 जून : पाकिस्तानकडून पहिल्यांदाच कुलभूषण जाधव प्रकरणात नरमाईची भूमिका घेतली आहे. ‘या प्रकरणात पुनर्विचार केला जाऊ शकतो,’ असं महत्त्वाचं विधान पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केलं आहे. त्यामुळे कुलभूषण जाधव प्रकरणात भारताला दिलासा मिळू शकतो.

‘कुलभूषण जाधव त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात अपील करू शकतात. जाधव न्यायालयाकडे दयेचा अर्ज करू शकतात. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यास पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा आणि राष्ट्रपती ममनून हुसेन यांच्याकडे दयेचा अर्ज करण्याची मुभा जाधव यांना आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पुनर्विचार केला जाऊ शकतो. या प्रकरणाचा पुनर्विचार करण्यासाठी वाव आहे’, असे महत्त्वपूर्ण विधान पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान सरकारने एका पत्रकातून कुलभूषण प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली होती. ‘जोपर्यंत जाधव यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व दया याचिकांचा अवलंब केला जात नाही, तोपर्यंत त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार नाही,’ असं पाकिस्तान सरकारने पत्रकात म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 21, 2017 12:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...