टेक्नॉलॉजीची कमाल! 11 वर्षांनी भेटले आई-बाबा, Google Mapच्या मदतीने घरी परतला मुलगा

टेक्नॉलॉजीची कमाल! 11 वर्षांनी भेटले आई-बाबा, Google Mapच्या मदतीने घरी परतला मुलगा

गुगलच्या मॅपच्या साहाय्याने हवे त्या ठिकाणी जाता येते. एखादा रस्ता आपल्याला माहित नसल्यास गुगल मॅपच्या मदतीने आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. पण इंडोनेशयामधील एक 17 वर्षीय मुलगा याच गुगल मॅपच्या मदतीने तब्बल 11 वर्षांनी आपल्या कुटुंबाला भेटू शकला.

  • Share this:

इंडोनेशिया, 17 ऑक्टोबर : गुगलच्या मॅपच्या (Google Map) साहाय्याने हवे त्या ठिकाणी जाता येते. एखादा रस्ता आपल्याला माहित नसल्यास गुगल मॅपच्या मदतीने आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. पण इंडोनेशयामधील एक 17 वर्षीय मुलगा याच गुगल मॅपच्या मदतीने तब्बल 11 वर्षांनी आपल्या कुटुंबाला भेटू शकला. इंडोनेशयामधील सेन्ट्रल जावा प्रोव्हिन्समधील  स्राजेन (Sragen) या गावात ही घटना घडली आहे.  Ervan Wahyu Anjasworo असं या मुलाचे नाव असून तो अनाथाश्रमात राहत होता.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, त्याची आजी त्याला लहान असताना एका मार्केटमध्ये घेऊन जायची. त्याने या मार्केटचा गुगल मॅपवरून शोध लावला. त्यानंतर या आश्रमाच्या व्यक्तींनी या मुलाचे घर शोधून काढत त्याच्या कुटुंबीयांची आणि त्याची भेट घडवून आणली. आपला मुलगा तब्बल 11 वर्षांनी घरी आल्यानंतर त्याच्या आई वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. इतकी वर्षे आपल्या मुलाची काळजी घेणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत. पाच वर्षांचा असताना या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं.

(हे वाचा-आशा नेगीबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर या अभिनेत्रीला डेट करतोय रित्विक? PHOTO VIRAL)

व्हिडीओ गेमच्या दुकानातून घरी येत असताना रस्त्यावर डान्स करणाऱ्या एकाने त्याचे अपहरण केले होते असल्याची माहिती मिळते आहे. त्यानंतर पुढील दोन वर्षे त्याच्याकडून रस्त्यावर डान्स करत भीक मागून घेतली. एक दिवस रस्त्यावर डान्स करत असताना पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजल्याने किडनॅपरने तिथून पळ काढला. त्यावेळी पोलिसांना सापडलेल्या Ervan ला त्यांनी अनाथाश्रामत ठेवलं. गेली नऊ वर्षे तो या अनाथाश्रमात राहत होता.

दरम्यान, याठिकाणी राहत असताना एक दिवस त्याने या मार्केटचा पत्ता गुगल मॅपवरून शोधून काढला. त्याठिकाणच्या दुकानाचा पत्ता सापडल्यानंतर आश्रमाच्या व्यक्तींनी त्या दुकानदाराशी संपर्क साधला. या दुकानदाराला या कुटुंबाविषयी विचारले असता त्यांना या कुटुंबाचा एक फोटो मिळला. या फोटोमधून त्याने आपल्या कुटुंबाला ओळखल्यानंतर आश्रमाने त्याला त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 17, 2020, 8:41 AM IST
Tags: Google

ताज्या बातम्या