मराठी बातम्या /बातम्या /विदेश /दुर्मिळ आजारानं ग्रस्त झाली महिला, स्वतःचाच चेहरा गेली विसरुन

दुर्मिळ आजारानं ग्रस्त झाली महिला, स्वतःचाच चेहरा गेली विसरुन

महिलेला फेस ब्लाइंडनेस(Face Blindness) म्हणजेच प्रोसोपाग्नोसिया(Prosopagnosia) या दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे. यामध्ये व्यक्ती इतरांचे चेहरे ओळखण्यास सक्षम नसतो. परंतु  या महिलेला स्वतःचाच चेहरा ओळखण्यास अडचण येत आहे.

लंडन 19 फेब्रुवारी : जगभरात विविध प्रकारचे दुर्मिळ आजार (Rare Condition) आढळून येतात. परंतु असा दुर्मिळ आजारदेखील अस्तित्वात ज्यामुळे ती व्यक्ती स्वतःलाच विसरुन जाते. ब्रिटनच्या डर्बीशायरमधील लॉरेन निकोल-जोन्स या 33 वर्षीय महिलेला याच आजारानं ग्रासलं आहे. महिलेला फेस ब्लाइंडनेस(Face Blindness) म्हणजेच प्रोसोपाग्नोसिया(Prosopagnosia) या दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे. यामध्ये व्यक्ती इतरांचे चेहरे ओळखण्यास सक्षम नसतो. परंतु  या महिलेला स्वतःचाच चेहरा ओळखण्यास अडचण येत आहे. स्वतःच्या लग्नाच्या फोटोंमध्ये तिला स्वतःला ओळखू शकत नाही.

मिररशी बोलताना तिनं आपण पांढऱ्या गाऊनमुळे स्वतःला ओळ्खल्याचं सांगितलं. जर गाऊन नसता तर स्वतःला ओळखणं अवघड झालं असतं असंही तिनं म्हटलं. कधीकधी स्वत:लाच फोटोंमध्ये ओळखू शकत नसल्यामुळे आयुष्य कठीण बनलं असल्याचंदेखील ती म्हणाली. तिच्या या दुर्मिळ आजारामुळे ती तिच्या जवळच्या मित्रांना, सेलिब्रिटींना आणि स्वतःला देखील ओळखू शकत नाही. या आजारावर कोणतेही उपचार नाहीत. त्यामुळं तिनं लोकांना त्यांच्या सवयी, आवाज आणि पद्धतींनी ओळखण्यास शिकलं आहे.

वयाच्या 12 व्या वर्षांपासून तिची अतिशय जवळची मैत्रीण असलेल्या महिलेलादेखील तिनं वाढदिवसाच्या पार्टीत कसं ओळखलं नाही हे सांगितलं. तिच्या या दुर्मिळ आजारामुळं तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागल्याचंदेखील सांगितलं. यामुळे अनेकदा चुकीच्या व्यक्तीबरोबर 40 मिनिटे संवाद साधल्याचंदेखील तिनं सांगितलं. या आजारामुळं तिला चित्रपट पाहण्यातदेखील अडचणी येत असून एकसारख्या चेहऱ्यांमुळे तिला अडचण निर्माण होत आहे. यामुळं तिनं पुस्तक वाचण्याकडं आपला मोर्चा वळवला आहे.

ऑलिव्हर सॅक या न्यूरोलॉजिस्टचे पुस्तक वाचल्यानंतर तिला आपल्या या आजाराचा अंदाज आला. 50 जणांमध्ये 1 व्यक्तीला हा आजार होत असून यावर अद्यापपर्यंत उपचार उपलब्ध नाही. डॉक्टरांकडेदेखील या अवस्थेबद्दल जास्त माहिती उपलब्ध नसून मेंदूमध्ये विशिष्ट भागातील मेमरी नष्ट झाल्यानं हे होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. लॉरेन तिचा नवरा आणि तिच्या जवळच्या काही कुटुंबातील सदस्यांना ओळखते. याचबरोबर अधिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून ती आपल्या आजाराविषयी इतर लोकांशी जास्त बोलत नाही.

First published:
top videos

    Tags: Rare disease, Women