मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

विचित्र! ही महिला स्वतःला मानते जादूगार, म्हणे चौथ्या वर्षापासूनच भेटतात आत्मे

विचित्र! ही महिला स्वतःला मानते जादूगार, म्हणे चौथ्या वर्षापासूनच भेटतात आत्मे

आपण जादूगार असून अनेक भूताखेतांसोबत (A woman claims to be friend of ghost and spirits in Britain) आपली ओळख असल्याचा दावा एका महिलेनं केला आहे.

आपण जादूगार असून अनेक भूताखेतांसोबत (A woman claims to be friend of ghost and spirits in Britain) आपली ओळख असल्याचा दावा एका महिलेनं केला आहे.

आपण जादूगार असून अनेक भूताखेतांसोबत (A woman claims to be friend of ghost and spirits in Britain) आपली ओळख असल्याचा दावा एका महिलेनं केला आहे.

  • Published by:  desk news

लिंकनशायर, 24 ऑक्टोबर : आपण जादूगार असून अनेक भूताखेतांसोबत (A woman claims to be friend of ghost and spirits in Britain) आपली ओळख असल्याचा दावा एका महिलेनं केला आहे. जगात अनेकांना भूत किंवा आत्मा असं म्हटलं की भीती वाटते. अनेकजणांना तर भुताच्या केवळ कल्पनेनंही (Fear of ghost) घाम फुटतो. अशा परिस्थितीत जर एखादी महिला तिची भुतांसोबत ओळख असल्याचं सांगत असेल तर? नेमका हाच दावा इंग्लंडच्या लिंकनशायरमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं केला आहे.

काय आहे दावा?

या जगात आत्मे, भुतं वगैरे गोष्टी केवळ आहेत असं नव्हे, तर त्या आपल्याला सतत भेटत असतात, असा दावा शैली मायेस हॉर्नकैसल या महिलेनं केला आहे. 53 वर्षांची शैली तिच्या काही मैत्रिणींसोबत रोज तिच्या दुकानात याबाबतचे प्रयोग करत असते. शैली आपल्या चरितार्थासाठी एक गिफ्ट शॉपी चालवते. विविध भेटवस्तू आणि दागिने विकण्याचं काम करते. तिच्या सर्व मैत्रिणीदेखील भुताखेताच्या बाबतीतील तज्ज्ञ असून याबाबत आपलं सतत संशोधन सुरु असल्याचा दावा ही महिला करत असते.

आठव्या वर्षीच शिकली जादू

शैलीनं आठव्या वर्षापासून विविध जादू शिकायला सुरुवात केली होती. आठव्या वर्षी ती टॅरो कार्ड रिडिंग करत होती. ज्या वयात मुलांना टॅरो कार्ड म्हणजे काय हे माहितही नसतं, त्या वयात ती लोकांना टॅरो कार्ड वापरून मार्गदर्शन करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर हातावरील रेषा वाचण्याची कलादेखील ती शिकली आणि लोकांचे हात वाचून त्यांना त्यांचं भविष्य सांगू लागली. चौथ्या वर्षापासून आपल्याला भुतं दिसत होती, असा दावा तिनं केला आहे. त्यावेळी आपल्याला त्यांची भीती वाटायची, मात्र नंतर आपली त्यांच्याशी मैत्री झाली, असा दावा तिनं केला आहे. आपण घराच्या खिडकीतून मागच्या बाजूच्या मोकळ्या रानात चप्पल फेकून द्यायचो आणि कुणीतरी ती चप्पल पुन्हा घरी आणून ठेवायचं, असा दावाही तिनं केला आहे.

हे वाचा- कायच्या काय! इथे लग्नात पैसे देऊन बोलावले जातात पाहुणे; कारण जाणून व्हाल अवाक

गिऱ्हाईकांना वाटते भीती

शैलीच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना अनेकदा तिची भीती वाटते. अनेकजण तर तिच्या भितीने दुकानात येत नाहीत. आता तिने जादूटोण्याचं दुकान सुरू केलं असून सर्व प्रकारच्या भुताखेतांच्या समस्यांपासून ज्योतिषविद्येपर्यंत सर्व सेवा पुरवत असल्याचा दावा केला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ तिच्या दुकानात बसतात आणि व्यवसाय करतात. सध्या ब्रिटनमध्ये या दुकानाची जोरदार चर्चा आहे.

First published:

Tags: Astrology and horoscope, Britain