Home /News /videsh /

आता या 31 चीज बर्गरचं काय करायचं? 2 वर्षांच्या मुलाचा प्रताप पाहून आईचा संताप

आता या 31 चीज बर्गरचं काय करायचं? 2 वर्षांच्या मुलाचा प्रताप पाहून आईचा संताप

मुलांच्या मोबाईल वापराबाबत पालकांनी सतर्क राहणं गरजेचं असल्याचं नेहमी म्हटलं जात आहे.

    नवी दिल्ली, 18 मे : लहान मूल (Kids) म्हणजे मातीचा गोळा असतो. जसं घडवू तसा घडतो. मुलांवर सर्वांत जास्त प्रभाव घरातील व्यक्तींचा असतो. कारण ती अधिकाधिक वेळ घरातच असतात. घरातील इतरांकडे पाहून मुलं शिकतात. चालणं, बोलणं, हावभाव या सगळ्याबाबतीत मोठ्यांचं अनुकरण करतात. तसंच मोबाईलबाबतीतही घडतंय. पालकांच्या (Parenting) हातातले मोबाईल (Mobile) पाहून मुलंही मोबाईल वापरायला शिकली आहेत. अनेक अ‍ॅप्स वापरण्याची माहिती मुलांना शिकवावी लागत नाही, इतकंच नाही तर मोबाईलचे पासर्वडही मुलांना पाहूनपाहून ओळखता येतात. अमेरिकेतल्या एका 2 वर्षांच्या मुलाचा किस्सा अजूनच अजब आहे. आईच्या मोबाईलवरून त्यानं चक्क 31 चीज बर्गरची ऑर्डर दिली आणि वरून घरपोच डिलिव्हरीसाठी टिपही दिली. याबाबतची माहिती देणारं वृत्तझी न्यूज हिंदीनेप्रसिद्ध केलं आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या केल्सी बुर्खाल्टर गोल्डन (Kelsey Burkhalter Golden) यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, की बॅरेट या त्यांच्या दोन वर्षांच्या मुलानं डोरडॅश अ‍ॅपचा वापर करून मॅकडोनाल्डमधून (McDonald’s) 31 चीज बर्गर (Cheese Burger) ऑर्डर केले. त्यासाठी 61.50 डॉलर रुपये त्याने खर्च केले. तसंच यासाठी त्याने 16 डॉलरची (1200 रुपये) टिपही दिली. या पोस्टसोबत त्यांनी बर्गर शेजारी घेऊन एक बर्गर खात असलेल्या बॅरेटचा फोटोही शेअर केला आहे. मुलांच्या नको इतक्या मोबाईल वापरामुळे अनेक समस्या उद्भवतात. मुलांसाठी तर हे धोक्याचं असतंच; पण काही वेळा पालकांनाही ते अडचणीत आणतात. या आधी न्यू जर्सीतील अयांश कुमार या दोन वर्षांच्या मुलानं आईच्या मोबाईलवरून 2 हजार डॉलरचं फर्निचर ऑर्डर केलं होतं. त्याची मोठी किंमत त्याच्या पालकांना मोजावी लागली होती. याबाबतची बातमीही व्हायरल झाली होती. त्याचप्रमाणे आता या लहानग्याने चीज बर्गर ऑर्डर केले आहेत. आपल्या मुलाच्या हातात फोन होता, पण तो फक्त फोटो काढतोय असं वाटल्याचं केल्सी यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. आपल्याकडे 31 चीज बर्गर असून कोणाला ते हवे आहेत का, असा प्रश्न विचारून आपल्या दोन वर्षांच्या मुलाला डोरडॅश अ‍ॅपवरून ऑर्डर करता येते, असंही त्यांनी म्हटलं आहे. मुलांच्या मोबाईल वापराबाबत पालकांनी सतर्क राहणं गरजेचं असल्याचं नेहमी म्हटलं जातं. त्यांच्यासमोर मोबाईल शक्यतो वापरू नये, त्यामुळे त्यांनाही तसं करावंस वाटणार नाही. तसंच कामाचा भाग म्हणून मोबाईल वापरताना मुलांशी योग्य तो संवाद साधला जाणं आवश्यक आहे, ज्यामुळे मुलांना मार्गदर्शन मिळेल. मोबाईल हा आता कामाचा भाग झाला आहे. त्यामुळे त्याचा वापर अनिवार्यच आहे. पण मुलांचं संगोपन करताना कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं, याचा विचार पालकांनी केला पाहिजे.
    First published:

    Tags: Cheese

    पुढील बातम्या